एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांना काल बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलविण्यात आले आहे. अकोला कारागृहात तुपकरांसह 25 सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. 

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकर (Ravikant Tupakar)  यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुपकरांसह त्यांच्या 25 सहकाऱ्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान रविकांत तुपकरांनी तुरुगांतही अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे..

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. रविकांत तुपकरांना काल बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलविण्यात आले आहे. अकोला कारागृहात तुपकरांसह 25 सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. 

रविकांत तुपकरांचा आत्महदनाचा प्रयत्न 

रविकांत तुपकरांनी दोन दिवसांपासून जेवण केलेले नाही, त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरु होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. शनिवारी (11 फेब्रुवारी) तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. तुपकर पोलीसी वेशात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली. तुपकरांना आत्मदहनापासून रोखल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ते आंदोलनला बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

कापूस सोयाबीनला दरवाढ नाही, पीक विमा मिळाला नाही

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच तुपकरांनी म्हटलं आहे. 

रविकांत तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय?

  • सोयाबीन, कापसाला दरवाढ द्यावी 
  • सरकारच्या दुर्लक्षामुळे 70 ते 80 टक्के सोयाबीन, कापूस घरात पडून 
  • पीक विम्याची रक्कम मिळावी
  • अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget