(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crop insurance: पावसाने नुकसान झाल्यास, विमा कंपनीकडे कशी कराल तक्रार? ऑनलाइन तक्रारीची A to Z प्रक्रिया पहा इथे
Crop insurance: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल. या स्टेपवरून तक्रार करता येईल.
Crop insurance claim: राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. विदर्भासह मराठवाडयात पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालं असेल तर 72 तासांच्या आत कळवणं बंधनकारक आहे. यासाठी काय करायचं? विमा कंपनीला कशी करायची तक्रार,ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वाचा..शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत नुकसान झाल्याचे विमा कंपन्यांना सांगणं आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करावी?
या स्टेप्स वापरून करता येईल तक्रार
यासाठी तुम्ही मुळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणीकृत आवश्यक आहे.
१. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून Crop insurance ॲप डाऊनलोड करायचा आहे.
२. त्यानंतर Continue as guest हा पर्याय निवडा
३. यात पीक नुकसान हा पर्याय निवडा
४. यात पीक नुकसानाची पूर्वसचना या पर्यायावर क्लिक करा
५. यानंतर तुमचा मोबाईल नं टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका
६. पुढील टप्प्यात हंगाम-खरीप, वर्ष-2024 योजना आणि राज्य निवडा
७.नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. यात पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका.
८. ज्या गट क्रमांकमधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा
९. नक्की कशामुळे नुकसान झाले? याचा तपशील भरा. पिकांचा फोटो काढून सबमीट करा
१०. यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket Id मिळेल. यावरच तुम्हाला विमा मिळतो. त्यामुळे हा नं जपून ठेवा.
प्रधानमंत्री पीक विमाच्या वेबसाईटवरूनही करता येईल तक्रार
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल. त्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या संकेतस्थळावर जा. https://pmfby.gov.in/ यानंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिककरून कोणत्या इंन्शूरंस कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपले सर्व तपशील भरा. त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नं सेव्ह करा.
कृषीविभागाकडेही करता येईल तक्रार
यासाठी कृषी विभागाकडून हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. यासाठी नुकसानाची तक्रार दाखल संबंधित विभागाकडून टोल फ्री क्रमांक 14447 करू शकतात. या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या एक नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात.