Poultry Farming : कुक्कुटपालनातून प्रत्येक महिन्याला मिळवा एक लाख रुपये, कशी कराल सुरुवात?
पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये मिळवू शकता. यातून कमी दिवसांमध्ये तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो.
Business Idea For Startup : तुमच्या मनात जर एखादा व्यवसाय किंवा उद्योग करायचा विचार असेल आणि तो व्यवसाय करण्यासाठी तुमची कठोर परिश्रम करण्याची इच्छा असेल तर एक व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकेल. हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. हा व्यवसाय तुम्हाला दुप्पट नफा मिळवून देऊ शकतो. तो व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming). पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये मिळवू शकता.
पोल्ट्रीचा व्यवसाय कमी दिवसांमध्ये तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला किमान 5 ते 8 लाख रुपयांची गरज आहे. एवढ्या भांडवलात तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरु करु शकता. सुरुवातील तुम्ही 1 हजार 200 ते 1 हजार 500 कोंबड्यापासून पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय सुरु करु शकता. याद्वारे तुम्हाला महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये मिळू शकतात.
नेमकी व्यवसायाची सुरुवात कशी कराल?
सर्वप्रथम शेडसाठी आणि उपकरणांसाठी सुमारे 4 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. 1 हजार 500 कोंबड्यांचे लक्ष्य ठेवून काम सुरु करायचे असेल तर 10 टक्के जास्त कोंबड्या तुम्हाला खरेदी कराव्या लागतील. कारण, रोगांमुळे कोंबड्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. व्यवसाय करत असताना अन्नापासून औषधापर्यंतचा खर्च होता. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागणार आहे. त्यांना वाढवण्यासाठी विविध प्रकारचे अन्न द्यावे लागेल. कोंबड्यांना 20 आठवडे खाद्य द्यावे लागणार आहे. 20 आठवड्यांनंतर कोंबड्या अंडी घालण्यास सुरुवात करतात. त्यानंतर वर्षभर त्या अंडी घालतात. एक कोंबडी एका वर्षात सुमारे 300 अंडी घालले. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की 20 आठवड्यांनंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च होतील.
1 हजार 500 कोंबड्यांपासून दरवर्षी सरासरी सुमारे 4 लाख 35 हजार अंडी तयार होतात. यामध्ये जर 4 लाख अंडी विकली गेली आणि एक अंडे साडेतीन रुपये दरानं विकले गेले तर एका वर्षात अंडी विकून 14 लाख रुपये कमावता येतात. त्यामुळं या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो. परंतू या व्यवसायात उतरण्यापूर्वी चांगले प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.