बटाट्याच्या उत्पादनात वाढणार तर टोमॅटोचे उत्पादन कमी होणार, कृषी मंत्रालयाचा अंदाज
कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) जारी केलेल्या तिसऱ्या आणि अद्ययावत आकडेवारीनुसार, बागायती पिकांच्या एकूण उत्पादनात 8.07 दशलक्ष टनांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
Agriculture News : कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) जारी केलेल्या तिसऱ्या आणि अद्ययावत आकडेवारीनुसार, बागायती पिकांच्या एकूण उत्पादनात 8.07 दशलक्ष टनांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ अंदाजे 2.32 टक्के आहे. 2022-23 या कालावधीत 355.25 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे, जे 2021-22 मध्ये 347.18 दशलक्ष टन होते. हवामानाशी संबंधित आव्हाने असतानाही देशात फळबाग पिकांचे उत्पादन वाढले आहे. यामागे देशातील कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांची मेहनत आहे. त्यांच्याच बळावर हे यश मिळाल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांन व्यक्त केलं. दरम्यान, या अंदाजानुसार बटाट्याच्या (Potato) उत्पादनात वाढ होणार आहे, तर टोमॅटोच्या (Tomato) उत्पादनात घट होणार आहे.
बटाट्याचे उत्पादन वाढीचा अंदाज
फळांच्या उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2021-22 मधील 107.51 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 2022-23 मध्ये 109.53 दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. तर भाजीपाल्याचे उत्पादन 209.14 मेट्रिक टनाच्या तुलनेत 288.88 मेट्रिक टन होते. यासोबतच बटाट्याच्या उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या 56.18 दशलक्ष टनांच्या तुलनेत बटाट्याचे उत्पादन 60.22 दशलक्ष टन असू शकते. परंतु टोमॅटोचे उत्पादन घटू शकते. टोमॅटोचे उत्पादन 20.69 दशलक्ष टनांवरून 20.37 दशलक्ष टनांपर्यंत कमी होऊ शकते. मात्र, सरकारनं कांदा उत्पादनाबाबत कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. कारण यामुळं कांद्याचे भाव वाढण्याची भीती सरकारला आहे. कांद्याच्या उत्पादनाबाबत केलेल्या तिसऱ्या अंदाजात उत्पादनात घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 31.7 दशलक्ष टन होते तर ते 30.2 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
फळे आणि भाजीपाल्याचे क्षेत्र घटून उत्पादन वाढलं
फळे आणि भाजीपाला या दोन्हींचे वाढणारे क्षेत्र कमी झाले आहे. परंतू, तरीही उत्पादन जास्त आहे. यावरुन हेक्टरी उत्पादन वाढल्याचे दिसून येत आहे. यामागे देशातील कृषी शास्त्रज्ञांची मेहनत दडलेली आहे. उच्च उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात त्यांना यश आले असून त्यामुळेच आज इतके उच्च उत्पादन घेतले जात आहे. बागायती पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र 28.04 दशलक्ष हेक्टरवरुन 28.34 हेक्टरपर्यंत वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजीपाल्याचे क्षेत्र 11.37 दशलक्ष हेक्टरवरून 11.36 हेक्टरवर घसरले आहे. तर फळांचे क्षेत्र 0.6 दशलक्ष हेक्टरवरून सात हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यात सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मध उत्पादन आणि फुलांची लागवड यांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
FCI कडून 4.26 लाख टन गव्हाची विक्री, पिठाच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता