PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला मिळणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना ईकेवायसी करावी लागणार आहे.
नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Schemen) 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत 17 हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना 34 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. आता पीएम किसानच्या वेबसाईटनुसार 5 ऑक्टोबरला योजनेतीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात 6 हजार रुपये पाठवले जातात. मात्र, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. ई केवायसी केली नसल्यास त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 18 वा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरला दिली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात मिळाली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची रक्कम एका हप्त्यात दिली जाते.
ई केवायसी करणं बंधनकारक
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करुन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही त्यांना 18 व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. त्यामुळं ज्यांनी अद्याप पीएम किसान सन्मान योजनेची ई केवायसी केली नसेल त्यांनी तातडीनं करुन घेणं आवश्यक आहे.
ई केवायसी कुठं करणार?
ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तिथं ई केवायसी या पर्यायवर क्लिक करावं. ई केवायसी पर्यायवर क्लिक केल्यानंतर ओटीपी बेस्ड ई केवायसी हा पर्याय दिसेल. इथं तुम्हाला आधार क्रमांक नोंदवावा लागेल. आधार क्रमांक नोंदवल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी मिळेल. ओटीपी नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. जर, तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटला भेट देऊन ई केवायसी करता आली नाही तर नागरी सुविधा केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करता येईल.
आधार बँक लिंकींग आणि जमीन पडताळणी
पीएम किसान सन्मान योजनेतून आर्थिक रक्कम मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचं बँक खातं आणि आधार क्रमांक लिंक करुन घेणं आवश्यक आहे. तर, जमीन पडताळणी देखील करुन घेणं आवश्यक आहे.
इतर बातम्या: