एक्स्प्लोर

कधी जमा होणार PM किसानचा 15 वा हप्ता? त्यापूर्वी करा 'हे' काम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM kisan samman nidhi yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. दवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हफ्ते जमा झाले आहे. 15 वा हफ्ता कधी जमा होणार? याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे.  

तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर भुलेख क्रमांक, बँक खात्याचा नंबर, आधार कार्ड यासह eKYC करणे आवश्यक आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी 2,000 रुपयांची ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ते जमा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

या अटींची पूर्तता करावी लागेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काही काम करावे लागतील. शेतकऱ्यांनी ताबडतोब जमिनीच्या नोंदी क्रमांक, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि पीएम किसान पोर्टलवर ईकेवायसी करून घ्यावी. यासाठी शेतकरी नोंदणीसाठी अधिकृत साइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकता. पीएम किसान योजना नोंदणी स्थिती देखील तपासा. या दरम्यान कोणतीही माहिती चुकीची भरली आहे का ते तपासा. तसे असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा. नाहीत पुढील हप्ता मिळताना अडचणी येऊ शकतात. 

ई-केवायसी व्यतिरिक्त, तुमचा आगामी हप्ता इतर कारणांमुळे देखील अडकू शकतो. तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. नावामध्ये चूक, चुकीचा आधार क्रमांक किंवा चुकीचा पत्ता इत्यादी माहिती बरोबर द्यावी लागेल. ही माहिती बरोबर नसल्यास हप्त्यापासून वंचित राहू शकेल. याशिवाय, खाते क्रमांक चुकीचा असला तरीही, तुम्ही आगामी हप्त्यांपासून वंचित राहू शकता. अशा परिस्थितीत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्जाच्या स्थितीवर दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करा.

अडचण आल्यास इथे संपर्क करा

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Yojana) रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या रकमेत वाढ करुन मोदी सरकार महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. PM किसान योजनेची रक्कम सरकार 6000 रुपयावरुन 8000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी घेणार मोठा निर्णय, 'या' योजनेतून शेतकऱ्यांना देणार पाठबळ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget