एक्स्प्लोर

Agriculture News : 'या' तारखेआधी पीक स्पर्धेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

Agriculture News : कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई  जवस या पिकांसाठी ही पीक स्पर्धा आयोजित केली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. 

राज्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत गौरव करुन प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवण्यात येते. पीक स्पर्धा तालुका स्तर, जिल्हास्तर आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात येणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

पीक स्पर्धेत भाग सहभागी होण्यासाठी निकष काय?

या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटास 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी, तसेच तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धकाची स्वतःच्या शेतावर त्या पिकाच्या बाबतीत किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. 

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, शेतकऱ्याने संबंधित ७/१२  वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय बक्षीस तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर अनुक्रमे 10 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार, द्वितीयसाठी 40 हजार तसेच तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी 

पीक स्पर्धेच्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

PMFBY Scheme : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार भेट! तलाव, ट्रॅक्टर आणि जनावरांनाही मिळणार पीक विम्याचा लाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update :Sudarshan Ghule सह तीन आरोपींची हत्येची कबुली Walmik Karadचा पाय खोलातTop 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP MajhaKunal Kamra Eknath Shinde Controversy : कामराच्या विडंबनाला एकनाथ शिंदेंचं काय उत्तर? Special ReportUddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
IPL 2025 RR Vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा कणा असलेल्या सुनील नरेनला 1628 दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर केलं, खरं कारण समोर आलं
कोलकाता नाईट रायडर्सचा कणा असलेल्या सुनील नरेनला 1628 दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर केलं, खरं कारण समोर आलं
Shani Gochar 2025 : 29 मार्चला शनी अमावस्या, 'या' 3 राशींनी राहावं अलर्ट; जाणून घ्या शनी अमावस्येचा 12 राशींवर होणारा परिणाम
29 मार्चला शनी अमावस्या, 'या' 3 राशींनी राहावं अलर्ट; जाणून घ्या शनी अमावस्येचा 12 राशींवर होणारा परिणाम
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
Embed widget