एक्स्प्लोर

Agri Tourism day : कृषी पर्यटन दिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन, शेतकऱ्यांचा होणार सन्मान  

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

Agri Tourism day : दरवर्षी 16 मे ला आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. तसेच कार्यक्रमात एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. नाविन्यपूर्ण पद्धती वापरुन यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाणार आहे.

कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरु शकते म्हणूनच, या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य असेल. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने व वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ज्यांची माहिती करुन घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावं, असं आवाहन पर्यटन विभाग व एटीडीसीने केले आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच कृषी पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) चे संस्थापक  पांडुरंग तावरे यांच्यासह सर्व विभागातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 

कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन

कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतो. शेतीची कामे कशी चालतात त्याचा  स्वतः  अनुभव  घेऊन  निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळते. तसेच निरामय आयुष्य  जगण्याची  प्रेरणा देखील मिळते. 2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती. यंदा परिस्थिती सुधारल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने, प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. इथे अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती वल्सा नायर सिंग यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना असल्याचे म्हटले आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील. गावांचा शाश्वत विकास होईल. 6 प्रादेशिक उपसंचालक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून संबंधित विभागात कृषी पर्यटन क्षेत्राची व्याप्ती आणि संधी समजावून सांगतील, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी पर्यटन विकास महामंडळाचे संस्थापक पांडुरंग तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. हे धोरण राबवल्यापासून  शेतकऱ्यांच्या रोजगारात 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. या कृषी पर्यटन केंद्रांवर 2018, 2019 आणि 2020 साली अनुक्रमे 4.7 लाख, 5.3 लाख  आणि 7.9 लाख पर्यटक भेट देऊन गेले.  या  पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना 55.79 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील एक लाख  महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. पुणे, रायगड, सातारा अशा अनेक  जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ  शेतकऱ्यांच्या जीवनावर नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Embed widget