Soyabean InterCrop : नंदुरबारात ऊसामध्ये घेतलं सोयाबीनतं आंतरपीक, पंचक्रोशीत रंगली चर्चा
Nandurbar Maharashtra Agriculture Marathi news : नंदुरबार येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे.
Nandurbar Maharashtra News : खरीप हंगामात जमिनीत पडलेल्या सोयाबीनच्या (Soyabean | Agriculture Marathi news) बियाण्याचा वापर करत ऊसात सोयाबीनचे आंतरपीक घेण्याचा अनोखा प्रयोग सारंगखेडा येथील प्रगतशील शेतकरी पंकज रावल यांनी केला आहे. एकाच पिकातून दोन उत्पादने घेण्याचा अनोखा प्रयोग नंदुरबार येथे साकारला आहे.
नंदुरबार (Nandurbar) येथील शेतकरी पंकज रावल यांनी खरीप हंगामात सहा एकर सोयाबीनची लागवड केली होती. मजुरांच्या टंचाईमुळे हार्वेस्टरद्वारे त्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. सोयाबीनची काढणी केल्यानंतर रावल यांनी या सहा एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली मात्र हे करत असताना रावल यांच्या लक्षात आले की, हार्वेस्टरद्वारे सोयाबीन काढल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतात पडत असते. या सोयाबीनच्या बियाणांचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लागवड केलेल्या ऊसाला पाणी देत असताना सोयाबीनलाही पाणी दिले गेले त्यातून ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला.
मागील वर्षी पंकज रावल यांना यातून चांगले उत्पादन आले होते. एका वेळेस एकाच पाण्यावर सोयाबीन आणि ऊसाची शेती त्यातून आंतरपीक म्हणून घेतले. सोयाबीनचे मिळणारे उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन काढल्यानंतर सोयाबीनच्या पाला पाचोड्यापासून मिळणारे खत तसेच जमिनीतील वाढणारी नत्राची मात्रा ऊस उत्पादनात वाढ देते त्यामुळे सोयाबीनच्या अंतरपिकातून तिहेरी फायदा रावल यांना झाला आहे.
वातावरणातील होणारे बदल आणि त्याचा पिकांवरचा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपिकाची शेती करणे महत्त्वाचे आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम एका पिकाला झाल्याने नुकसान झाले. तर दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळूनही मात्र शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडत नसल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांनी आंतरपीक यासारख्या दुहेरी पद्धतीचा वापर करत उत्पादन घेण्याचे आवाहन पंकज रावल यांी केले आहे.
Agriculture Marathi news : Nandurbar Maharashtra News
ऊसाची शेती करत असताना शेतकऱ्यांनी आंतरपीक या संकल्पनेचा उपयोग केल्यास त्यांना दुहेरी उत्पन्नासोबत शाश्वत उत्पादनाचा दुसरा मार्ग सापडतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आह हे पंकज रावल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकरी (Farmer) संकटात सापडला असतानाच दुसरीकडे नंदुरबारातील सारंगखेडामधील पंकज रावल शेतकऱ्यांने कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जीवावर ऊसातील आंतरपीक म्हणून सोयाबीनच्या शेतीचा प्रयोग त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या यशोगाथाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.