MS Swaminathan daughter : 'शेतकऱ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक', भारतरत्न जाहीर झालेल्या स्वामिनाथन यांच्या मुलीची केंद्र सरकारवर सडकून टीका
MS Swaminathan daughter : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीबाबत कायदा करावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत असलेल्या वागणुकीवरुन नुकताच भारतरत्न जाहीर झालेल्या एम. एस. स्वामीनाथन यांच्या मुलीने (MS Swaminathan daughter) यांच्या मुलीने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
MS Swaminathan daughter : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी किमान आधारभूत किंमतीबाबत कायदा करावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत असलेल्या वागणुकीवरुन नुकताच भारतरत्न जाहीर झालेल्या एम. एस. स्वामीनाथन यांच्या मुलीने (MS Swaminathan daughter) यांच्या मुलीने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. 'केंद्र सरकार शेतकऱ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत आहे', असे मधुरा स्वामिनाथन यांच्या मुलीने म्हटले आहे. एम एस स्वामिनाथन यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करुन सन्मान केला होता. दरम्यान त्यांचा सन्मान करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावा,असे मधुरा स्वामिनाथन म्हणाल्या आहेत.
'शेतकरी आपला अन्नदाता आहे'
दिल्लीतील पुसा येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) आयोजित केलेल्या कार्यक्रमात मधुरा स्वामिनाथन यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य केले. "शेतकरी हे आपला अन्नदाता आहे. त्यांना गुन्हेगारांसारखे वागणूक दिली जाऊ शकत नाही.
यावेळी त्यांनी शेतकरीआंदोलनाबाबत हरियाणा सरकारने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला होता.
शेतकऱ्यांसोबतच्या बैठका निष्फळ
चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये 12 फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती. मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली आणि मंगळवारपासून दिल्लीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
मागण्या मान्य होणार नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहिल - सरवन सिंग पंढेर
शेतकरी नेते (Farmer Protest Leader) आणि पंजाब किसान मजूर संघर्ष समितीचे महासचिव सरवन सिंग पंढेर (Sarvan singh pandher) म्हणाले, जवळपास 10,000 लोक शंभू सीमेवर आहेत. शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. ड्रोनच्या आधारे आमच्या अश्रू धूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, सरकार जोवर मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असे पंढेर यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने काय म्हटले?
शेतकरी दिल्लीत दाखल झाल्यानंतर अनेक रोड ब्लॉक झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, पंजाब आणि हरियाणातील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारनेही काम करावे, आंदोलनामुळे कोणालाही त्रास व्हायला नको, असे निरिक्षण न्यायलायाने नोंदवले आहे. या प्रकरणावर आता 15 तारखेला सुनावणी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या