(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turmeric Research Centre : बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटलांची नियुक्ती
हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Turmeric Research Centre : सर्वाधिक हळदीचं उत्पादन घेणार जिल्हा म्हणून हिंगोली (Hingoli) जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र (Balasaheb Thackeray Turmeric Research Centre) उभारले जाणार आहे. या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून शिंदे गटात सामील झालेले हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हेमंत पाटील हे हळद संशोधन केंद्रासाठी करत होते पाठपुरावा करत होते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन घेतलं जातं. परंतू, या हळदीवर योग्य असं संशोधन केलं जात नव्हतं. याच हळदीला जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख निर्माण व्हावी आणि या हळदीचे संशोधन व्हायला हवं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून कृषी तज्ज्ञांसोबत हेमंत पाटील वारंवार भेटी घेऊन संशोधन केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करत होते. अखेर यावर्षी सादर झालेल्या आर्थिक बजेटमध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला 100 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
यावर्षी या संशोधन केंद्रासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार
महाविकास आघाडी सरकारनं 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे. 14 सप्टेंबला हा शासानिर्णय काढण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावाने हे संशोधनं केंद्र उभारले जाणार आहे.
यावर्षी देशातून विक्रमी हळदीची निर्यात होणार
भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढत आहे. यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात (export) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता आहे. भारतीय हळदीला सध्या जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: