Dairy Business : आता जम्मू काश्मीरमध्येही होणार 'श्वेतक्रांती', हजारो रोजगार उपलब्ध होणार
जम्मू काश्मीरमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना 350 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. 16 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
Dairy Business : शेतीला महत्त्वाचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडं (Dairy Business) बघितलं जातं. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला जातो. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही (Jammu-Kashmir) दूध उत्पादनाला (Milk Production) चालना देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. 350 कोटी रुपयांचा खर्च करुन 600 उद्योग विकसित केले जाणार आहेत. यातून 16 हजार नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत.
भारतातील मोठी लोकसंख्या दूध उत्पादनाशी निगडित आहे. दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. पशुपालकांना मदत करण्यासाठी प्राण्यांचा विमा देखील काढला जातो. याशिवाय सरकार दुग्ध व्यवसायासाठी अनुदानही देते. आता जम्मू काश्मीरमध्येही दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याचा राज्यातील सर्व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
5 वर्षात 350 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार
जम्मू-काश्मीरमध्ये डेअरी क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढील 5 वर्षांत 350 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पैशाच्या मदतीने दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. पशुपालकांशी थेट संपर्क करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. या नव्या योजनेनुसार 16 हजार तरुणांना दूध उत्पादनात नोकऱ्या मिळणार आहेत. याशिवाय 600 उपक्रम उभारले जाणार आहेत. या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना थेट मिळणार आहे.
दूध उत्पादनात 70 टक्के वाढ करण्याचा निर्धार
जम्मू-काश्मीर प्रशासन पशुपालकांना सतत मदत करत आहे. सध्याच्या कृती आराखड्यानुसार पुढील पाच वर्षांत दूध उत्पादनात 70 टक्के वाढ करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील प्रत्येकाला मिळेल.
दूध उत्पादनाचा खर्च वाढला
दुधाच्या उत्पादन खर्चात यावर्षी मोठी वाढ झाली आहे. दुधाळ जनावरांच्या चाऱ्याच्या दरात (Cattle Feed inflation price) मोठी वाढ झाली आहे. चाऱ्याचे दर हे मागील 9 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यावर्षी ऑगस्टमध्येच पशुखाद्याच्या महागाईनं (inflation) मागच्या 9 वर्षांचा विक्रम मोडला आहे. ऑगस्टमध्ये या किंमती 25.54 टक्क्यांनी वाढल्या होत्या. परंतू नोव्हेंबरपर्यंत हा आकडा वाढला आहे. सध्या चाऱ्याच्या किंमतीत 27.66 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा उत्पादन खर्च वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: