एक्स्प्लोर

ऐन श्रावणात झेंडूचे दर गडगडले, जाणून घ्या काय आहे कारण

Marigold Flower Prices: सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात बाजारात फुलांना मोठी मागणी असते. श्रावणात चढ्या भावाने झेंडूची फुले विकली जातात.

Marigold Flower Prices: सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात बाजारात फुलांना मोठी मागणी असते. श्रावणात चढ्या भावाने झेंडूची फुले विकली जातात. परंतु यंदाच्या वर्षी पावसाने झेंडूच्या फुलांची प्रत खलावली आहे. श्रावणात उच्च प्रतीच्या फुलला 50 ते 80 रुपये किलो दर मिळतो. परंतु यंदाच्या वर्षी पावसाने फुलांची क्वालिटी खलावली आणि सध्या झेंडूच्या फुलाला 20 ते 30 रुपये किलो दर आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव येथील राहुल पवार यांनी 3 एकरावर झेंडूची लागवड केली आहे. झेंडूचे दर घसरल्याने पवार चिंता व्यक्त करत आहेत.

दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी राहुल पवार यांनी झेंडूची बाग आहे. बागेत चांगली फुले बहरत आहेत. पंरतु असं असून देखील ते चिंतेत आहेत. त्याचं कारण म्हणजे फुलाला दर नाहीये.  श्रावण महिन्यात फुलांना चांगला दर मिळतो. परंतु यंदाच्या वर्षी श्रावण असून देखील फुलाला दर मिळाला नाही. 

याबाबत बोलताना शेतकरी राहुल पवार म्हणाले, दरवर्षी चांगला दर असतो. यंदाच्या वर्षी पाऊस जास्त असल्याने फुलात पाणी जात आणि फुलाला बुरुषी लागते, फुलं काळे पडते आणि खराब होतं. श्रावणात फुलांना मागणी जास्त असते. दर वर्षी श्रावण महिन्यात झेंडूच्या फुलांना 40 ते 80 रुपये दर असतो. पंरतु यंदाच्या वर्षी उच्च प्रतीच्या मालाला अवघा 20 ते 30 रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

जर आगामी काळात पाऊस कमी झाला नाही तर नुकसानीला सामोरं जावं लागेल, असं राहुल पवार म्हणाले. राहुल पवार यांच्याकडे स्वतःची 6 एकर शेती आहे. तर 10 एकर भाडे तत्वावर शेती करण्यास घेतली आहे. त्यातील 3 एकरावर कलकत्ता स्टंप या झेंडूच्या वाणाची लागवड केली आहे. राहुल पवार यांना आतापर्यंत 50 ते 60 हजार रुपये खर्च झाला आहे. तर अजून पीक निघेपर्यंत 40 ते 50 हजार त्यांना खर्च येणार आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे 2 वर्ष पिकाचे नुकसान झाले यंदाच्या वर्षी वाटलं होतं, चांगले पैसे मिळतील पण यंदाच्या वर्षी नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. दौंड तालुक्यातील यवत, खुटबाव, भांडगाव या भागात फुलांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पंरतु यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांची अवस्था ही राहुल पवार यांच्यासारखीच आहे. राहुल पवार यांच्यासारखे झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राहुल पवार यांचे पीक जोमात आहे, उत्पादन चांगलं आहे. फक्त मालाला दर नाहीये. त्याचं कारण सतत येणारा पाऊस. पावसाने थोडीशी उघडीप द्यावी, ज्याने करून होणारे नुकसान टळेल, अशी आशा राहुल पवार करीत आहेत.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं 5000 रुपयांची मदत जाहीर केली, पण 'या' गावातील एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, नेमकं कारण काय? 
सरकारनं 5000 रुपयांची मदत जाहीर केली, पण 'या' गावातील एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, नेमकं कारण काय? 
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Chandrashekhar Bawankule: जमीन 3 वर्षांपासून कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'
जमीन 3 वर्षांपासून कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले 'माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'
ऊस दरासाठी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, रविराज साबळे विवेकानंद पाटलांसह 200 जणाविरोधात गुन्हा दाखल 
ऊस दरासाठी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, रविराज साबळे विवेकानंद पाटलांसह 200 जणाविरोधात गुन्हा दाखल 

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget