Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान
पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली. पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे.
मुंबई : अवकाळीच्या संकटामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली. पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, पुण्यातल्या आंबेगावात गारपिटीचा (Hail Storm) जोरदार तडाखा बसला आहे. कांदा आणि बटाटा पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. तर निफाडमध्येही गारपिटीनं झोडपलं, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बसला आहे ढगाच्या सह बरसलेल्या पावसामुळे शेतातील कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या रात्रीच्या पावसामुळे चांगले संकटात सापडले आहेत कारण व्यसनीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे सुरुवातीपासूनच पाऊस काळ कमी कमी होता पावसाने मारलेली दडी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जोपासली होती परंतु रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे,
पुण्यात आंबेगाव तालुक्यातील बहुतांश गावात गारपिटीचा तडाखा
पुण्यातील उत्तर भागात काल अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. आंबेगाव तालुक्यातील बहुतांश गावात गारपिटीचा तडाखा बसलाय. कालची गारपीटीची दृश्य आता समोर आलेली आहे. लोणी, धामणी, खडकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे नुकसान झालंय. तर काही भागात बटाटा पिकाला काही प्रमाणात फटका बसलाय.
हिंगोलीत कापसाला मोठा फटका
हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बसला आहे. शेतातील कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या रात्रीच्या पावसामुळे चांगले संकटात सापडले आहेत. कारण वेचणीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे.
वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने पारनेरला झोडपले
अहमदनगर जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाचा पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात कांदा, टोमॅटो, मका, ज्वारी तसेच फळबागांना फटका बसला आहे. पारनेरच्या पानोली, जवळा, निघोज या गावांमध्ये गारांचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्यानी सकाळी पाहणी केली.दरम्यान शासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केली.
कांद्याचे मोठे नुकसान
उन्हाळा कांदा संपून आता लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झालेली असतांना आज अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा चांगलेच झोडपल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून दुष्काळाची परिस्थिती असतांना कांद्याची लागवड करून वाढवण्यात आला होती. शेतातून कांदे काढायचे अन् बाजारात विकायचे अशी परिस्थिती असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीने आज शेतकऱ्याचा कांद्यावर घाला घातला.या गारपिटीमुळे शेतातील कांदा सडून शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, गारपिटीमुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा ' कांदा ' टंचाई निर्माण होणार आहे.
20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात
आवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता आहे. पावसात भिजल्याने 30 टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज आहे. दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पाहा व्हिडीओ :