(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ageiculture News : अभिनव फार्मर्स क्लबच्या पुढाकारानं 25 डिसेंबरला कृषी मेळावा, 'या' विषयांवर शेतकऱ्यांना होणार मार्गदर्शन
अभिनव फार्मर्स क्लबच्या (Abhinav Farmers Club) पुढाकारानं कृषी मेळाव्याचे (Agricultural Fair) आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 25 डिसेंबरला पुणे-पौड रोड पिरंगुट याठिकाणी कृषी मेळावा होणार आहे.
Ageiculture News : कमी होत चाललेल्या जमिनी (Land), रासायनिक शेतीमुळं (Chemical farming) वाढत चाललेले आजार, शहराकडे जाऊन अडचणीत येणारी तरुण पिढी या सर्व गोष्टींचा आताच विचार करणं गरजेचं आहे. सर्व लोक सुखात, आनंदात आणि निर्व्यसनी रहावेत यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुळशी (Pune District Central Cooperative Bank Mulshi), ब्रह्मकुमारी मुळशी आणि अभिनव फार्मर्स क्लब (Abhinav Farmers Club), माण यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळाव्याचे (Agricultural Fair) आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 25 डिसेंबरला हा मेळावा होणार असल्याची माहिती अभिनव फार्मर्स क्लबचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके (Dnyaneshwar Bodke) यांनी दिली आहे.
कृषी मेळाव्यात 'या' विषयांवर मार्गदर्शन होणार
सर्व लोक सुखात आनंदात आणि निर्व्यसनी रहावीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी ब्रम्ह कुमारी केंद्र खुप जणांचे विचार सकारात्मक करून तरुण पिढी घडवण्याचे काम करीत आहे. 25 डिसेंबरला होणाऱ्या कृषी मेळाव्यात शाश्वत योगिक शेती, सेंद्रीय शेती आणि थेट विक्री, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या योजना, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी मार्फत कृषी योजना, कृषी पर्यटन या विषयी सर्वांना माहिती देण्यात येईल. यामध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा, संस्थाचा गौरव देखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमात काही स्टॉल्सही असणार आहेत. ते या विषयावरची माहिती देतील.
कोण करणार मार्गदर्शक
25 डिसेंबरला होणाऱ्या कृषी मेळाव्यात विविध तज्ञ मार्गदर्शन करमार आहेत. यामध्ये अभिनव फार्मर्स क्लबचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके, कृषीतज्ञ बाळासाहेब रुगे, सुनिल चांदेरे, बी के सुनंदा, बी के दशरथ, बी के महिंद्र, बी के करुणा हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शाश्वत योगिक शेती कशी करावी. त्याचे फायदे काय आहेत. तसेच सेंद्रीय शेती कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच व्यसनमुक्ती, शासकीय योजना, बँकेच्या योजनाबाबत माहिती देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. 25 डिसेंबरला सकाळी 10 ते एक या वेळेत हा कृषी मेळावा होणार आहे. हा मेळावा धनवेवाडी, पुणे-पौड रोड पिरंगुट याठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी तरुणांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: