Sadabhau Khot : मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो, आदित्य जी हे आपण कसं बरं विसरलात? सदाभाऊ खोतांचा ठाकरेंना सवाल
शिवसेनेच्या बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्यावर सदाभाऊ खोत यांनी टाका केली आहे.
Sadabhau Khot : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. जवळपास 40 आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुवाहटीत दाखल झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्याला खोत यांनी उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत
रविवारी शिवसेनेचा सांताक्रूझमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुवाहटीमध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. या आमदारांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना पुढच्या निवडणुकीत आपण पाडणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्त्व्यावर सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्य जी हे आपण कसं बरं विसरलात..???' असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले होतो आदित्य ठाकरे
गुवाहाटीला गेलेले 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. फुटीरवाद्यांना महाराष्ट्र कदापी माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे खातं असतं ते खातं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मग त्यांना कमी काय केलं असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली होती. त्यानंतरही त्यांनी 20 जूनला बंड केल्याचे ठाकरे म्हणाले. बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत. त्यामुळं आता पुढे नेमकं होणार हे पाहणं देकील महत्वाचं ठरणार आहे. मात्र, यानिमित्तानं राजकीय नेते मात्र ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: