एक्स्प्लोर

PM KISAN : पीएम किसान सन्मान योजना: बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध

Pm Kisan Yojana Aadhaar Link : केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

Pm Kisan Yojana Aadhaar Link : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून महिन्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना त्यांचे बँक खाते (Bank Account) आधार क्रमांकास (Aadhaar Number) जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येत आहे. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थींच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.  मात्र आधार जोडणी पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. त्यासाठी आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही. पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

सोबतच गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत 01 ते 15 मे या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात येत आहे. कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनिल चव्हाण यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची आढावा बैठक

महत्त्वाच्या बातम्या

मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला, तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, नेमकं काय दिलं आश्वासन?
मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला, तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, नेमकं काय दिलं आश्वासन?
मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यांना केला फोन, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यांना केला फोन, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल 
रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरु देऊ नका, कर्जमाफीच्या मुद्यावरुन खासदार निलेश लकेंचा सरकारवर हल्लाबोल 
अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही घात झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ 
अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही घात झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ 

व्हिडीओ

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Accident: तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
तीन माय-लेकरांसह आजीचा अंत; एकाच अपघातात सर्व काही हिरावलं; तांदूळवाडी दुर्घटनेत एकाच रात्री आठ जणांवर अंत्यसंस्कार
Vidhan Parishad: आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, विधानपरिषदेवरुन नाराजी
आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, विधानपरिषदेवरुन नाराजी
TMC Rebel MP : तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, खासदारकी वाचणार का? दहाव्या शेड्यूलनुसार नेमकी अट काय?
TMC च्या बंडखोर खासदारांचा NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय, दहाव्या अनुसूचीनुसार खासदारकी वाचणार की जाणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली, ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या घोषणेनं अच्छे दिन
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 सेकंदात संपत्ती 8 लाख कोटींनी वाढली,सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजी
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Embed widget