एक्स्प्लोर

lumpy skin disease: राज्यात लंपी परतलाय! जनावरांना सांभाळा, काय आहेत लक्षणे, कशी घ्यावी काळजी?

लंपी त्वचारोग पुन्हा जनावरांमध्ये दिसू लागला असून पशूपालकांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

lumpy skin disease: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात थैमान घातलेल्या लंपी रोगानं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. जनावरांच्या त्वचेवर गाठी, व्रण येऊन आतून पोखरणाऱ्या या रोगाचा राज्यातील काही गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह पशुपालकांना चांगलीच धास्ती बसली आहे. यावर जनावरांना वेळीच प्रथमोपचार आणि लसीकरण करून आणण्याचा सल्ला पशुवैद्यकीय तज्ञ देत आहेत. राज्यात जनावरांना लंपीची लागण होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. 

राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुधव्यवसाय करतात. या आजारामुळे दोन वर्षांपूर्वी अनेक दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. तर अनेक जनावरे भाकड झाली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता वेळेत लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.

काय आहेत लम्पीची लक्षणे?

आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथीना सूज येते.

सुरवातीस ताप येतो, दुधाचे प्रमाण कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, हळूहळू डोके, मान यासह कास इ. भागाच्या त्वचेवर १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात, तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो, डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, डोळ्यांची दृष्टी बाधित होते, पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही.

लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असून पशूपालकांनी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

दुधाळ जनावरांसह वासरांचीही घ्या काळजी

जनावरांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती कमी असल्यानं कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्यांना लगेच होतो. यात वासरे दगावण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांना दुधाळ जनावरांसह वासरांचीही काळजी घेणं आवश्यक आहे. 

अशी करा उपाययोजना

जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, जनावरांना गोचीड यापासून मुक्त ठेवावे. तसेच वातावरणाबरोबरच बाजारातून येणाऱ्या जनावरांकडून इतर पशूना संसर्ग होत आहेत. त्यामुळे पशुपालकांना बाजारातून आणलेले जनावरे इतर गुरांपेक्षा वेगळी ठेवावीत. त्यांना जवळपास

महिनाभर लांब अंतरावर बांधावे. तरीही लम्पीची बाधा झाल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत, जेणेकरून जनावरे लवकर दुरुस्त होतील, अन्यथा आजार वाढल्यास दुरुस्त होण्यास विलंब होऊ शकतो.

चिलटे, माश्या, गोचीड आणि डासांद्वारे लम्पी रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सजग होणं महत्त्वाचं आहे. गोठ्यातील भिणभिणणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा.

बाधित जनावरांच्या स्पर्शाने ही इतर जनावरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावर हे इतर जनावरांपासून सुरक्षित अंतरावर बांधावे.लम्पीचे विषाणू संक्रमणानंतर रक्तात पसरल्यावर एक ते दोन आठवडे राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Maharashtra Farm Loan Waiver Pune: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पुणे जिल्हा बँकेच्या 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
धक्कादायक! खते आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, भीषण अपघातात जागीच मृत्यू, बीडच्या केजमध्ये घडली घटना
 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?

व्हिडीओ

Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Embed widget