Dishaank app : जमिनीच्या संपूर्ण तपशीलासाठी कर्नाटक सरकारचं 'दिशांक अॅप', एका क्लिकवर मिळवा सर्व माहिती
जमिनीचं सर्वेक्षण किंवा जमिनीचे तपशील मिळवण्यासाठी कर्नाटक सरकारच्या महसूल विभागानं 'दिशांक लॉन्च केलं आहे.
Dishaank app : कर्नाटक सरकारच्या महसूल विभागानं जमिनीचं सर्वेक्षण किंवा जमिनीचे तपशील मिळवण्यासाठी एक नवीन अॅप लॉन्च केलं आहे. 'दिशांक' असे या अॅपचे नाव आहे. दिशांक अॅपद्वारे आपल्या मोबाईलवर एका क्लिकवर आपल्या मूळ जमिनीच्या नोंदी उपलब्ध होऊ शकतात. आपल्या जमिनीसंदर्भातील पूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. या अॅपद्वारे आपल्याला जमीन मालकाचे नाव, रेकॉर्डवरील जमिनीची व्याप्ती, मालकीचा प्रकार, जमिनीचा प्रकार, जमिनीवरील निर्बंध/दावे, जमिनीची श्रेणी आणि जमिनीवर होणारे इतर कोणतेही सक्रिय व्यवहारांची माहिती आपल्याला या अॅपमधून मिळते.
दिशांक अॅप वापरुन, तुम्ही कर्नाटकातील कोणत्याही जमिनीचा किंवा मालमत्तेचा तपशील मिळवू शकता. वापरकर्त्यांना भूखंडांचा सर्वेक्षण क्रमांक जाणून घेण्यास मदत करण्यासोबतच, अॅप त्यांना खरेदी करताना तो भूखंड कोणत्या प्रकारातील आहे, सरकारी आहे का? हे तपासण्यासाठी मदत करते.
दिशांक अॅपवर नेमकी काय माहिती मिळणार
जमीन सर्वेक्षण क्रमांक
जमिनीचे अचूक स्थान
जमिनीचा विस्तार
जमिनीवर सरकारी निर्बंध
जमिनीबाबत न्यायालयाचे आदेश
जमिनीवर बोजा
डिशंक अॅपमध्ये 1990 पासूनच्या सर्व जमिनीच्या नोंदी (जमीन प्रकल्पांतर्गत) डिजिटल केल्या आहेत. मोबाईल ऍप्लिकेशन कर्नाटक स्टेट रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर (KSRSAC) च्या कर्नाटक भौगोलिक माहिती प्रणाली कार्यक्रमांतर्गत विकसित केले आहे. KSRSAC उपग्रह डेटाचा स्रोत बनवते आणि SSLR विभागासारख्या एजन्सीला नाविन्यपूर्ण वापरासाठी प्रदान करते.
या अॅपचा उद्देश हा नागरिकांना जमिनीच्या डेटाबेसमध्ये नोंदवल्याप्रमाणे जमीन आणि तिच्या मालकीची माहिती मिळू शकेल. यामुळे पारदर्शकता येईल आणि नागरिकांना खरा मालक, जमिनीचे स्थान इत्यादी ओळखण्यास सक्षम करणे अपेक्षित आहे. ज्यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी होतील. हे अॅप लाखो लोकांनी डाउनलोड केले आहे. लोक आता त्याचा वापर करत आहेत. प्रत्येक सर्व्हेअरच्या नियमित कामाचा भाग आहे. हे खूप चांगले वापरलेले अॅप्लिकेशन आहे. ज्यांनी जमिनीच्या नोंदींच्या समस्येवर तांत्रिक उपाय शोधला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दिशांक अॅप हे 1965 च्या भू-सर्वेक्षणातील 70 ते 80 लाख जुन्या नकाशांच्या आधारे तयार केले आहे. दरम्यान, काम अजूनही चालू आहे. पूर्ण डिजीटलायझेशन होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही पुढील काही महिन्यांत लोकांना आमच्या उपविभागात (पोडी) ऍक्सेस करण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या भागात, KSRSAC ने कर्नाटकसाठी 30 हजार 854 गावांचे नकाशे डिजिटल केले आहेत. त्यानंतर एजन्सीने सर्व गावांचे नकाशे भू-संदर्भित केले.