एक्स्प्लोर

Farmers Competition : शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंचे बक्षिस जिंकण्याची संधी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्षातून एकदाच आयोजित करण्यात येत असून यात तालुकास्तरीय, जिल्हा स्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय गट आहे. तसेच प्रत्येक गटात वेगवेगळे पुरस्कार देण्यात येणार आहे.

नागपूर :  पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्याबरोबरच त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना  मिळून उत्पादनात मोलाची भर पडेल या उद्देशाने राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

ही स्पर्धा वर्षात एकदाच आयोजित करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, तुर, उडिद, सोयाबीन आणि भुईमुग पिकासाठी अर्ज करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे. पिक स्पर्धेतील पिकांची निवड करतांना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. मुंग व उडिद पिकांसाठी  अर्ज दाखल करण्याची  मुदत 31 जुलै राहील तर भात, बाजरी, मका, तुर, सोयाबीन व भुईमुंग पिकासाठी 31 आगस्ट मुदत राहणार आहे.

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या

पिकस्पर्र्धसाठी पूर्ण तालुका हा एक घटक आभारभूत धरण्यात येईल, किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असेल. पिकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 असेल. पिकस्पर्धेतील पिकाच्या कापणीसाठी प्लॉटची निवड सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार करण्यात येईल. पीक कापणी करताना असंबंधित मंडळातील अधिकारी यांना पर्यवेक्षण देण्यात येइल.

स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लागणारे निकष

पिक स्पर्धेसाइी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे. शेतकऱ्यांला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पीक स्पर्धा रद्द करण्यात येवून प्रवेश शुल्क परत प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. स्पर्धा जाहिर झाल्यानंतर सहभागी शेतकऱ्यास प्रवेश शुल्क परत दिले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पूरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील.

पीक स्पर्धा विजेते व बक्षिसांचे स्वरुप

तालुकास्तरीय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस याप्रमाणे प्रथम 5 हजार रुपये,  द्वितीय 3 हजार रुपये, तृतीय 2 हजार रुपये. जिल्हास्तर प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये. विभागस्तर प्रथम-25 हजार रुपये, द्वितीय- 20 हजार रुपये व तृतीय-15 हजार रुपये आणि राज्यस्तर प्रथम-50 हजार रुपये, द्वितीय- 40 हजार रुपये व तृतीय-30 हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरुप रहणार आहेत. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात(प्रपत्र-अ) मध्ये भरुन ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व सातबाराच्या उताऱ्यासह कागदपत्रांची पूर्तता करुन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

Nagpur : 'या' अभ्यासक्रमांत मिळतोय निशुल्क प्रवेश, दोन महिन्यांचे अनिवासी प्रशिक्षण

महत्त्वाच्या बातम्या

Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget