![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hingoli banana Crop : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा केळीच्या बागांना तडाखा, तत्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी
हिंगोली जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा खूप मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचं नुकसान झालं आहे.
![Hingoli banana Crop : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा केळीच्या बागांना तडाखा, तत्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी Hingoli banana Crop news Damage to banana crop due to heavy rains in Hingoli district, farmers demand help Hingoli banana Crop : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा केळीच्या बागांना तडाखा, तत्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/9389a725b176ad384cc29f610a6833a21659168593_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hingoli banana Crop : राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा खूप मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा खूप मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा भूईसपाट झाल्या आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पावसानं नुकसान झालेल्या भागाची अजित पवार आज पाहणी करणार आहेत. डोंगरकडा गावच्या शेत शिवारात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत. याठिकाणच्या केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी तर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या शेतकरी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन मदतीची मागणी करत आहेत. कारण या केळीच्या बागांसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला होता. मात्र, या अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यानं हातचे पिकं वाया गेलं आहे.
एकरी बागेसाठी दोन लाख रुपयांचा खर्च
केळीच्या बागेचं संगोपन करण्यासाठी एकरी दोन लाख रुपयांचा खर्च येतो. यातून आम्हाला एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत होते. पण आज सगळ्या बागेचं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दिला. आधीच कोरोना काळात आम्हाला केळीला मोठा फटका बसला होता. आता केळीचा दर वाढला असताना आम्हाला फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आम्हाला तातडीनं एक लाख रुपयांची मदत करावी अशी माघणी शेतकऱ्यानं केली आहे. केली हे आमचं मुख्य पीक आहे, केळीबरोबर सोयाबीन पिकाचे देखील नुसकान झालं आहे. बिना मायबाप असलेल्या लेकरासारखी आमची अवस्था झाल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय
आंधळ दळतय आणि कुत्र पिठ खातय अशी स्थिती या राज्याची सध्या झाली आहे. हेव्या देव्याच्या राजकारणात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागला असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. यात भर म्हणून पुन्हा नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं आहे. केळीच्या संपूर्ण बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. आज केळीचा दर वाढला असताना अतिवृष्टीनं आमचं अतोनात नुकसान झालं असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन माणसं राज्य हाकत आहेत. त्यांनी तत्काळ आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)