हिंगोली जिल्ह्यात अवकाळीचा तडाका, गहू हरभऱ्यासह ज्वारी आणि फळबागांचं मोठं नुकसान
हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलेच झोडपले आहे. यामुळं गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रे फळबाग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Unseasonal rain : सध्या हवामानात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. या अवकाळी पावसाची काही ठिकाणी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलेच झोडपले आहे. यामुळं गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रे फळबाग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
फळबागांना मोठा फटका
हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली, सेनगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळं शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासह संत्रा, मोसंबी या फळबागांना सुद्धा या पावसाचा फटका बसला आहे. सध्या ही सर्व पीक काढणीच्या अवस्थेत होती, परंतू, कालचे वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथील शेतकरी तुळशीराम मस्के यांच्या शेतातील सुद्धा संत्र्याच्या बागाचं मोठं नुकसान झालं आहे. झाडाला लागलेले सर्व संत्रे तुटून जमिनीवर पडले आहेत. त्यामुळं शेतात सगळीकडे संत्रे तुटल्याचं पाहायला मिळत आहे.
शेतामध्ये कापून टाकलेल्या गव्हाच्या पेंड्या पूर्ण भिजल्या
मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांनाही बसला फटका
महत्वाच्या बातम्या: