Mango Market: द्राक्षांच्या शहरात हापूसची गोडी! नाशकात क्विंटलमागे तब्बल 16 ते 20 हजारांचा दर मिळतोय, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?
Mango Market Maharashtra: सध्या नाशिकच्या बाजार समितीत हापूस आंब्याला क्विंटल मार्गे चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मालामाल होत आहेत . उर्वरित राज्यात काय स्थिती? वाचा

Alphanso Mango : कांदा आणि द्राक्षांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याला सध्या हापूसची चांगलीच गोडी लागलीय . गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हापूसला चांगला भाव मिळतोय . क्विंटल मागे 16000 ते 20 हजार पर्यंत भाव मिळत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी सुखावले आहेत . शनिवारी बाजारसमितीमध्ये 671 क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली .गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिकमध्ये हायब्रीड लोकल तसेच हापूस आंब्याची मोठी आवक होतेय . ( Market Yards ) मुंबईच्या फळ बाजारात हापूसला राज्यातील सर्वाधिक भाव मिळत आहे .क्विंटल मागे 30 ते 40 हजारांचा भाव मिळत आहे.
नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष या दोन पिकांनंतर आता आंब्यालाही उत्पादनासाठी पसंती दिली जात आहे .केशर बदाम या आंब्याचे पीक घेण्याचे प्रमाण जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे . कळवन सिन्नर दिंडोरी तालुक्यात नाशिकमधील सर्वाधिक आंबा लागवड केली जाते . सध्या नाशिकच्या बाजार समितीत हापूस आंब्याला क्विंटल मार्गे चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मालामाल होत आहेत . दरम्यान, किरकोळ बाजारात हापूस सध्या 800- 1000 रुपये डझनने विकला जात आहे.
उर्वरित राज्यात आंबा मार्केट कसे?
राज्यभरात सध्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून 21 ते 24 हजार क्विंटल पर्यंत राज्यभर वेगवेगळ्या जातींचा आंबा येत आहे . हापूस तोतापुरी लोकल हायब्रीड तसेच पायरी मद्रास अशा कितीतरी आंब्यांनी राज्यभरातील फळबाजार दरवळला आहे .पुण्यात सध्या लोकल आंब्याला क्विंटल मागे 11500 ते 15000 पर्यंत भाव मिळतोय . अहिल्यानगरमध्ये 11000 ते 14000 पर्यंत दर आहेत .नागपूर सांगली या जिल्ह्यांमधून तोतापुरी आंबा सर्वाधिक येत आहे .या आंब्याला साडेतीन ते पाच हजाराचा भाव मिळतोय . दोन दिवसांपूर्वी राज्यातील आंब्याचे बाजारभाव असे...
| अहिल्यानगर | --- | 30 | 11000 |
| धाराशिव | लोकल | 10 | 6500 |
| जळगाव | लोकल | 50 | 4500 |
| जळगाव | मद्रास | 70 | 4500 |
| मंबई | लोकल | 6871 | 10000 |
| मंबई | हापूस | 9335 | 30000 |
| नागपूर | लोकल | 2773 | 3438 |
| नागपूर | तोतापुरी | 3000 | 3750 |
| नाशिक | हायब्रीड | 1150 | 16000 |
| पुणे | लोकल | 40 | 9000 |
| सांगली | हापूस | 638 | 10250 |
| सांगली | तोतापुरी | 82 | 3250 |
| सोलापूर | लोकल | 121 | 3500 |
| सोलापूर | लोकल | 140 | 1000 |
| सोलापूर | हापूस | 337 | 2000 |
| राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 24170 | ||
हेही वाचा:























