पतंजलीचं नवं मॉडेल शेतकऱ्यांच्या बंजर जमिनींवर काम करणार, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा समृद्धीचा आराखडा नेमका काय?
शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते.

Patanjali: भारताच्या ग्रामीण भागात कृषीवर आधारित एक क्रांतिकारी मॉडेल सादर करत असल्याचा दावा पतंजली आयुर्वेदाने केला आहे. यात त्यांनी असं म्हटलं की कंपनीचा किसान समृद्धी कार्यक्रम हा जैविक शेतीला प्रोत्साहन देणारा असून ग्रामीण समृद्धीचा हा ठोस आराखडा ठरत आहे. या आराखड्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून पर्यावरण रक्षणाला ही हातभार लागतो. हे मॉडेल केवळ आर्थिक विकासालाच चालना देत नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेकडे लक्ष देणारा असल्याचा पतंजलीने सांगितलं.
पतंजलीचे हे मॉडेल मध्य प्रदेशमधील माऊगंजसारख्या भागातील बंजर आणि उत्सर जमिनीला सुपीक बनवण्यावर लक्ष करणारे असल्याचं कंपनीने सांगितलं. या भागात कंपनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि संसाधनांचा वापर करत पिकांची विविधता प्रशिक्षण केंद्र आणि प्राथमिक प्रक्रिया युनिट्स बनवत आहे. शेतकऱ्यांना जैविक खत, उच्च दर्जाचा बियाणं आणि कीटक नियंत्रणासाठी विनामूल्य उपाय दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचं सांगण्यात येते.
शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन खरेदीवर भर
या मॉडेलमध्ये मध्यस्थांना वगळून थेट शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदीवर भर दिला जात असल्याचे पतंजलीने स्पष्ट केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळतो .पारदर्शक व्यापार पद्धतीला यामुळे चालना मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते .याव्यतिरिक्त कंपनी डिजिटल साक्षरतेला ही प्रोत्साहन देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजाराची माहिती व अन्य संसाधनांपर्यंत सहज पोहोचता येते .
मातीची सुपीकता व टिकाऊ शेतीला चालना
पतंजलीच्या म्हणण्यानुसार हा उपक्रम मातीची सुपीकता पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि जलसंधारणावर आधारित आहे .पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाच्या वापरातून टिकाऊ शेतीला चालना दिली जाते जे दीर्घकालीन दृष्टीने ग्रामीण भागांसाठी फायदेशीर ठरत आहे .मध्यप्रदेशातील विविध प्रदेशात औद्योगिक पार्क उभारणी आणि रोजगार निर्मितीच्या योजना या मॉडेल साठी आणखी बळकट ठरत आहेत .
स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास
पतंजली चा सदाब आहे की कंपनीचं हे मॉडेल ग्रामीण भागात सामूहिक विकासाची भावना वाढवणारा आहे .हा आराखडा केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत नाही तर स्थानिक समुदायांमध्ये कौशल्य विकास आणि जनजागृती ही घडवतो .परिणामी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहेत .
हेही वाचा:
Health Tips : ब्रेन ट्यूमर समजून घेताना; काय आहेत लक्षणं, कारणं आणि उपचार? वाचा तज्ज्ञांचा सल्ला























