एक्स्प्लोर

Monsoon news : शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला, प्रत्येक शुक्रवारी होणार मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजासंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.

K S Hosalikar on Monsoon news : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. यामुळं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मान्सूनच्या संदर्भातील माहितीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या शेतकरी बांधवांना हवामानाच्या अंदाजासंदर्भात विषेश मार्गदर्शनासाठी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार : कृष्णानंद होसाळीकर

पावसाच्या घडामोडीसंदर्भातील माहितीसाठी  महाराष्ट्र शासन कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे. कृषी विभाग भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून  शेतकरी बांधवांना प्रत्येक शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. प्रत्येक शुक्रवारी शेतकऱ्यांना साप्ताहिक हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे. तसेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील देण्यात येणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. याचा राज्यातील शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे होसाळीकर म्हणाले.

 

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

दरम्यान, राज्याच्या विविध भागत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळं आयुक्तालयात 20 हून अधिक वाहन अडकली होती. झाड हटवायला बराच वेळ लागला, त्यानंतर वाहनं आयुक्तालयातून बाहेर पडली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं विविध ठिकाणी सुमारे 30 झाडपडीच्या घटनांची अग्निशमाक दलाकडे नोंद झाली आहे. तसेच नाशिक शहरात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस झाला

पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल

पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून रात्रीपासून ढगांच्या गडगडाटाह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वातावरणात असलेला उकाडा कमी झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून बळीराजाही सुखावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget