एक्स्प्लोर

Monsoon 2023: पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पालघरमध्ये पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी

Palghar News: यंदा मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत.

Monsoon 2023 Palghar: पालघर जिल्हा विविध भागात विभागलेला असून डोंगरी नागरी आणि सागरी विभागात पसरलेल्या या जिल्ह्यात पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. नेहमी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस हजेरी लावतो. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा उलटून देखील वरूण राजाने दडी मारली आहे. पालघर जिल्ह्यातील भातशेतीचे सरासरी पेरणी क्षेत्र 7664.42 हेक्टर असून यापैकी फक्त 473.13 हेक्टर क्षेत्रात अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. या आठवड्यापर्यंत फक्त 6.17 टक्के पेरणी पालघर जिल्ह्यात झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला बराच उशीर झाल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

जिल्ह्यात 73 हजार क्षेत्र लागवडीखाली आहे. भात पेरणी करताना दहा गुंठ्यामध्ये भाताची रोपे तयार केले जातात. ती तयार झाली की मग त्याच आवणि करून संपूर्ण शेतात ठराविक अंतरावर त्याची आवणी करून शेतातील शंभर टक्के क्षेत्र वापरले जाते 7664.42 हेक्टर क्षेत्र पेरण्याच्या खालचे आहे. त्यापैकी 473.13 हेक्टर क्षेत्रावर अजून पर्यंत पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बोअरवेल असल्यामुळे त्यांनी आपली कामे पूर्ण केली आहे मात्र जिल्ह्यातील बरेच शेतकरी विहिरी बोअरवेल नसल्यामुळे ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात.  पावसाने पाठ फिरवल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अजून पाऊस लांबला तर पेरणी कशी होणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पालघर जिल्ह्यात तीन प्रकारच्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते हळव, गरव आणि निमगरव पद्धतीची लागवड होते. हळव हे 90 ते 110 दिवसाचे असते. वरकर जमीन भुसभुशीत जमीन इथे या प्रकारच्या भाताची लागवड होते. गरव भात पाणथळ जागी होतो तिथे पाणी साठवण असेल अशा ठिकाणी हे भात तयार होतो. ह्या भातास तयार होण्यासाठी 135 ते 140 दिवसाचा कालावधी लागतो. तर निम गरवचा कालावधी हा 115 ते 125 दिवसाचा असतो. हा प्रकार किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये प्रामुख्याने होत असतो.

ज्या ठिकाणी 80 टक्क्यापेक्षा जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवतात. मात्र, यावर्षी पावसाने उशीर केल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती केलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी नांगरणीस सुरुवात करण्यात आली असून काहीजण नांगराने, तर काहीजण ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचे दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी त्याचे क्षेत्र हे फक्त 473 हेक्टर असल्याने लांबलेला पाऊस शेतकऱ्यांना रडवतो की काय अशी स्थिती सध्या दिसत आहे.

तालुका       सरासरी पेरणी क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र   टक्केवारी

पालघर           1532.85.             124.05.             8.12
 वसई               789.12.              36.25.              4.59
डहाणू             1385.81.              22.44.             1.62
तलासरी            938.72.              4.35.               1.53
वाडा               1441.17.             24.00.             1.67
विक्रमगड         716.47.           143.20.            19.99
जव्हार.              658.70.            38.29                5.81
मोखाडा             201.58.           70.10.              34.78

एकूण         7664.42 हेक्टर         473.13 हेक्टर          6.17 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget