Climate change : हवामान बदलाविषयी ब्रिक्स देशांची उच्चस्तरीय बैठक, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भूमिका
कार्बन उत्सर्जन कमी करणे, अनुकूल परिवर्तन आणि विकास साध्य करण्यासाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
Bhupendra Yadav on Climate change : हवामान बदलाविषयी एकत्रित येवून चर्चा करण्याची गरज आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, अनुकूल परिवर्तन आणि विकास साध्य करण्यासाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केले. भूपेंद्र यादव यांनी हवामान बदलाविषयी ब्रिक्सच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला, त्यावेळी त्यांनी भूमिका मांडली.
वस्तूंचा सजगतेने वापर करणे आणि कचरा कमी करणे यावर आधारित शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी हवामान बदलासंबंधी भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आज नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत अधिवास, अतिरिक्त जंगले आणि वृक्ष आच्छादनाच्या माध्यमातून कार्बन सिंकची निर्मिती, शाश्वत वाहतूक, ई-गतिशीलता, यामध्ये चांगले काम करत आहे. हवामान वचनबद्धतेसाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे यासाठी अनेक ठोस पावले सरकार उचलत असल्याची माहिती यावेळी मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
भारताने हरितगृह वायू उत्सर्जन आणि आर्थिक विकास परस्परापासून विलग करणे कसे जारी ठेवले आहे, याचा उल्लेखही यावेळी यादव यांनी केला. तसेच विकसनशील देशांकडून हवामानविषयक महत्वाकांक्षी निर्णयांची अंमलबजावणी ही यूएनएफसीसीसी आणि पॅरिस करारानुसार अनिवार्य केली आहे. त्यानुसार हवामान विषयक बाबींसाठी पुरेसे वित्तीय पाठबळ, तंत्रज्ञान हस्तांतरण,अंमलबजावणीसाठी सहाय्य यावर अवलंबून आहे, असल्याची यादव यांनी सांगितले. ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांनी हवामान बदलावरील सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि सहयोगाची व्याप्ती अधिक वाढवून ती सखोल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यापुढे देशांनी पर्यावरण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रामध्ये धोरणात्मक देवाण-घेवाण आणि सहकार्य करण्याचे मान्य केले. या प्रसंगी एक संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले आहे. चीनचे पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण मंत्री हुआंग रुनक्यू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ब्राझिल, रशिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका या बिक्समधील देशांच्या पर्यावरण खात्यांचे मंत्री उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: