(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडिलांसाठी मुलीनं सोडली 15 लाखांची नोकरी, आज शेतीतून करतेय कोट्यावधींची कमाई
वडिलांची देखभाल करण्यासाठी या मुलीनं आयटी कंपनीमधील 15 लाखांची नोकरी सोडली आहे. शेतीमधून ती कोट्यावधी रुपयांची नोकरी करत आहे.
Agriculture News : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी सकटांचा सामना करावा लागतो. मात्र, या संकटांवर मात करत काही शेतकरी यशस्वी शेती करत आहे. अशाच एका छत्तीसगडमधील मुलीनं यशस्वी शेती केली आहे. वडिलांची देखभाल करण्यासाठी या मुलीनं आयटी कंपनीमधील 15 लाखांची नोकरी सोडली आहे. नोकरी सोडून सध्या मुलगी भाजीपाल्याची शेती करत असून, वर्षाला कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवत आहे.
छत्तीसगडमधील रायपूरमधील स्मरिकाने आपल्या वडिलांची देखभाल करण्यासाठी 15 लाखांची नोकरी सोडली आहे. रायपूरमधून स्मरिकाने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केल्यानंतर पुण्यातून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाली. दरम्यान, तिच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि ती परत आली. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2020 मध्ये स्मरिकाने स्वत: 23 एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची शेती सुरू केली. शेतीतील वाढता नफा पाहून मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग त्यात रस दाखवत आहे. अनेक तरुणांनी लाखो रुपये पगाराच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकऱ्या सोडून शेतीचा पर्याय निवडला आहे. अशीच एक शेतकरी स्मरिका आहे. ती छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील कुरुड ब्लॉकमधील चारमुडिया गावातील रहिवासी आहे. ती वडिलांसोबत शेती करत आहे.
2020 मध्ये स्मरणिकेने शेती करण्यास सुरुवात केली
रायपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केल्यानंतर तिने पुण्यातून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाली. येथे त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे 15 लाख रुपये होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. दरम्यान, तिच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि ती परत आली. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2020 मध्ये स्मरिकाने स्वत: 23 एकरांवर भाजीपाल्याची शेती सुरू केली आहे.
1 कोटींहून अधिक उलाढाल
शेती सुरू करण्यापूर्वी, स्मरिकाने शेती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे सुरू केले. याचा तिला खूप फायदा झाला. जमिनीच्या गुणवत्तेनुसार योग्य बियाणे आणि योग्य पीक निवडले. आता स्मरिका त्याच्या शेतीतून दररोज 12 टन टोमॅटो आणि 08 टन वांग्याचे उत्पादन घेत आहेत. या भाज्यांचा पुरवठा देशातील विविध राज्यांमध्ये केला जात आहे. याशिवाय ती या भाज्यांची विक्री आणि पुरवठा करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर घेते. तसेच, आता त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींहून अधिक आहे. याशिवाय 150 जणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
नोकरी सोडण्याबद्दल स्मरिका काय म्हणाली?
शेतीला करिअर म्हणून स्वीकारण्याबाबत स्मरिका सांगते की, तिने नोकरीपासून करिअरची सुरुवात केली. ती चार वर्षे पुण्यात राहिली, त्यानंतर ती रायपूरला गेली. सध्या स्मरिका तिच्या गावात राहून शेती करते. आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळं ततिने वडिलांच्या आजारपणानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. आज ती तिच्या कामात पूर्णपणे समाधानी आहेत. स्मरिका विविध पिकांची निर्यात करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
बीडच्या गांडूळ खताची परदेशात निर्यात, वर्षाला शेतकरी कमावतोय 15 लाखांचं उत्पन्न