एक्स्प्लोर

Kisan Railway : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय, शेतमालाच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी

किसान रेल्वेची सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

Kisan Railway : मध्य रेल्वेने  शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी किसान रेल्वेची सुरुवात केली होती. मात्र, अचानक ही किसान रेल्वेची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं, ही शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. किसान रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी मात्र विरोध केला आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून विजेचे संकट निर्माण झाले आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे वीज टंचाई निर्माण झाली आहे. अशातच आता किसान रेल आणि मालगाड्या 13 एप्रिल पासून काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतूकीची गैरसोय झाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम होणार आहे. रेल्वे विभागाने घेतलेल्या अचानक निर्णयाचा परिणाम होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर दुसरीकडे किसान रेल अधिकचा वेळ एकाच थांबल्यास शेतीमालाचे नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगतिले जात आहे.

मध्य रेल्वेने किसान रेल्वे बंद करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी मात्र विरोध केला आहे. रेल्वे सुरु न केल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. किसान रेल्वे 30 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंद केली आहे. ज्या रेल्वे लाइनवरून किसान रेल्वे जाते त्याच लाइनवरुन मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जाते. उन्हाळ्यामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबवल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेतकऱ्यांची फळे, भाजीपाला यासह विविध पिकांना परराज्यातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी किसान रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती.
सांगोला येथून पहिली किसान रेल्वे सुरु करण्यात आली होती. कोरोना काळात ही किसान रेल्वे सुरु करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब, द्राक्ष, पपई, पेरु, सीताफळ, चिकू, शिमला, मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, शेवगा, आले, लिंबू असा शेतीमाल देशातील विविध राज्यांमध्ये कमी खर्चात वाहतूक होत होता.
 
महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget