एक्स्प्लोर

Animal husbandry : महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, राज्यात 793 कोटींचे कर्ज वाटप

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. या योजनेंतर्गंत राज्यात 793 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Animal husbandry infrastructure : महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या योजनेंतर्गंत राज्यात 793 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून, 53 कोटींची व्याज सवलत प्रदान करण्यात आलं आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत जास्त उद्योजकांना प्रेरित करणे. तसेच या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते राज्याला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीनं दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित 'पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात' हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्रातसह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशला पुरस्कार

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी तसेच योजनेच्या जागरुकतेसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरवण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तरप्रदेशला  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.      

उद्योजकांना 793 कोटींचे कर्ज वाटप 

केंद्र शासनानं पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष 2020 मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडे एकूण 916 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी पात्र 73 अर्जांमधून आतापर्यंत 26 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. या उद्योजकांना 793 कोटींचे कर्ज वाटप आणि 53 कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण 15 हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील 20 उद्योजकांचा सन्मान

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील 75 व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील 20 व्यक्ती आणि संस्थांचा समावेश आहे. या कार्यक्रमात 75 पैकी प्रातिनिधिक 10 उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री  पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योर्तिलिंग मिल्क फुड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद फिड मिल, रोहिणी सुचित्रा पोवार, अनुप श्रीनिवास पडमल या संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विशाल अशोक मोकाशी, हुवेफार्मसी पुणे प्रा. लि, नेचर डिलाइट कॅटल फीड्स प्रा. लि., ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कृष्णा डेअरी आणि  मुंबई  येथील  ग्रॅव्हिस फूड्स प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील गौगंगा फूड प्रा. लि.,जलाराम व्हेटकेअर इंडस्ट्रीज प्रा. लि. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मयुर प्रताप पाटील, दमयंती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील डेलेक्टो फूड्स प्रा. लि., बीड जिल्ह्यातील विमल ॲग्रो आणि सांगली जिल्ह्यातील एम. एस. बी जी चितळे यांनाही गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget