(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato : नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची आवक घटली, किलोला मिळतोय 100 ते 120 रुपयांचा दर
देशासह राज्यात देखील टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची आवक घटली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे.
Tomato Price : सध्या देशासह राज्यात देखील टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सध्या टोमॅटो आहेत, त्यांना मोठा फायदा होत आहे. तर दर वाढल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. दरम्यान, सद्या नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची आवक घटली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली असून, किलोला 100 ते 120 रुपयांचा दर मिळत आहे.
सद्या नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये टॅामेटोची नेहमी 40 ते 60 गाड्यांची आवक होत असते. आज मात्र फक्त 15 ते 20 गाड्यांची आवक बाजार समितीत झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये दरानं शंभरी गाठल्याने किरकोळ मार्केटमध्ये टॅामेटोचे दर हे 130 ते 150 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील काही भागात टोमॅटोचे दर हे 140 ते 150 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. दिल्लीत टोमॅटोला १४० रुपयांचा दर मिळत आहे.
पुरवठा कमी झाल्यानं दरात वाढ
सध्या राज्याच्या काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक भागात अद्याप पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं तिथे नवीन टॅामेटोचं उत्पागन नाही. त्यामुळं सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा पुरवठा कमी आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच दक्षिणेतून येणाऱ्या टोमॅटोनं बाजारातील सर्व विक्रम मोडले आहेत. काही ठिकाणी राज्यात टोमॅटोचे दर हे 140 रुपये किलोवर पोहोचले आहेत. पेट्रोलचा दर प्रती लिटर 107 रुपये असून टोमॅटोनं पेट्रोलच्या दराला मागे टाकलं आहे. यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विदर्भातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटो मे महिन्यापासून बाजार येणं बंद झाले आहेत. परिणामी ग्राहकांची मागणी बघता विदर्भात दक्षिणेतून टोमॅटो आयात केली जात आहेत. मात्र, मागणीनुसार टोमॅटोचा अगदी कमी पुरवठा होत असल्यानं टोमॅटोचे दर वाढल्याचं सांगितलं जातं आहे.
दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर
देशातील बहुंताश राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा टोमॅटोच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या पावसामुळं टोमॅटो पिकांचं नुकसान देखील झालं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळं बाजारात टोमॅटोचा तुटवडा देखील भासत आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत टोमॅटोचे दर हे 140 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रात 100 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती. तर बिगबास्केटवर टोमॅटोचे दर हे 105 ते 110 रुपये किलोवर आहेत. टोमॅटोचे दर केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर भागातही गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ ही हवामानातील झालेल्या बदलामुळं झाल्याचे सरकारनं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Tomato Rate : दिल्लीत टोमॅटोच्या दरात मोठी वाढ, प्रतिकिलोला 140 रुपयांचा दर