Rice Procurement : देशात मोठ्या प्रमाणावर सरकारकडून तांदळाची खरेदी, 'या' राज्याचा विक्रम
Rice Procurement : देशातील अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारकडून तांदळाची खरेदी (Rice Procurement) सुरु आहे.
Rice Procurement : देशातील अनेक राज्यांमध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी (Rice Procurement) सुरु आहे. काही राज्यांमध्ये तांदळाची खरेदी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी अद्याप सुरुच आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP) मात्र, थोडी संथ गतीने तांदळाची (Rice) खरेदी सुरु आहे. अशातच उत्तर प्रदेश सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकरी (Farmers) जोपर्यंत विक्रीसाठी तांदूळ आणतील तोपर्यंत त्यांची खरेद सुरुच राहणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे. आतापर्यंत छत्तीसगडमध्ये 100 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्रमी खरेदी केली आहे.
छत्तीसगडमध्ये तांदळाची 100 लाख मेट्रिक टन विक्रमी खरेदी
छत्तीसगडमध्ये तांदूळ खरेदीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी तिथे करण्यात आली आहे. तसेच तांदूळ खरेदी केल्यानंतर राज्य सरकार 72 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवत असल्याने शेतकरी देखील आनंदी आहेत. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 100 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली आहे. हा एक विक्रम आहे. राज्यात आतापर्यंत एवढी तांदळाची खरेदी कधीच झाली नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 17 जानेवारीपर्यंत 100 लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाची खरेदी झाली आहे.
तांदूळ खरेदी आणखी वाढणार
राज्य सरकारने तांदूळ खरेदीसाठी 31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. सध्या तांदूळ खरेदीची अंतिम मुदत पूर्ण होण्यास 11 दिवस शिल्लक आहेत. अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी तांदूळ विकण्यासाठी केंद्रांवर येत आहेत. आगामी काळात अधिक वेगाने खरेदी वाढणार आहे. त्यामुळे तांदूळ खरेदीचा नवा विक्रम होणार असल्याची माहिती तांदूळ खरेदी केंद्राशी संबंधित असलेल्या लोकांनी दिली आहे.
कृषीमंत्री अमरजित भगत यांनी केक कापत केला आनंद व्यक्त
छत्तीसगड राज्यात 100 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाल्याने राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकारीही खूश आहेत. राज्यात 100 लाख मेट्रिक टन धान खरेदीचा आकडा पार केल्याबद्दल कृषीमंत्री अमरजित भगत यांनी त्यांच्या कार्यालयात केक कापला. अधिक तांदूळ खरेदी झाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील छत्तीसगड सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहे. राजीव गांधी किसान न्याय योजना लागू झाल्यापासून. शेतकरी पुन्हा शेतीकडे वळत असल्याचे मत भगत यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या:
Rice Export: तांदूळ निर्यातवरील बंदी हटणार? 'या' कारणाने केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत