Agriculture News : 'मिशन' किटकनाशक बाजारात, सोयाबीनसह ऊस, भात आणि भाजीपाला पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी
Agriculture News : इन्सेक्टीसाइड (इंडिया) लिमिटेडचे नवीन काळातील 'मिशन' कीटकनाशक (Mission Pesticides) बाजारात दाखल झाले आहे. विविध प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हे किटकनाशक प्रभावी आहे.
Agriculture News : शेती क्षेत्रावर सातत्यानं विविध संकट येत असतात. कधी आस्मानी असतं तर कधी सुलतानी असतं. कधी दुष्काळ असतो, तर कधी अतिवृष्टी असते तर कधी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सध्याच्या काळात पिकांवर विविध प्रकारच्या किटकांचा, आळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचं चित्र दिसत आहे. यावर उपाय म्हणून इन्सेक्टीसाइड (इंडिया) लिमिटेडचे नवीन काळातील 'मिशन' कीटकनाशक (Mission Pesticides) बाजारात दाखल झाले आहे. सोयाबीन, ऊस, भात, भाजीपाला या पिकांवरील विविध प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हे किटकनाशक प्रभावी आहे.
इन्सेक्टीसाइड ही पीक संरक्षण आणि पोषण कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने बाजारात मिशन नावाचे किटकनाशक बाजारात आणले आहे. हे किटकनाशक विविध प्रकारच्या अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते. सोयाबीन, ऊस, भात, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी मिशन किटकनाशक प्रभावी आहे. ही महाराष्ट्रातील प्रभावी पीकं आहेत. त्यामुळं या किटकनाशकांमुळं शेतकऱ्यांना पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव रोखता येणार आहे. त्यामुळं पिकं वाचवण्यात मदत होणार आहे.
मिशन किटकनाशकाविषयी माहिती
मिशन किटकनाशक हे प्रभावी आहे. हे द्रव आणि दाणेदार फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे. मिशन हे पिकांसाठी फायदेशीर असणाऱ्या किटकांसाठी सुरक्षीत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. मिशन किटकनाशक हे सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला पिकांवरील अळ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण करते. ही महाराष्ट्रातील प्रमुख पिकं आहेत. त्यामुळं याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मिशनचे तांत्रिक आणि सुत्रीकरण हे आयआयएलद्वारे भारतात तयार केले जात आहे. ते पूर्वी आयात केले जात होते. हे ग्रीन श्रेणीतील किटकनाशक आयआयएलच्या मेक इन इंडिया उपक्रमातंग्रत संपूर्ण भारतातील लहान आणि सीमांत भारतीय शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आहे. मिशनमध्ये संपर्क आणि पद्धतशीर क्रिया आहे. यामुळं किटकांचे प्रभावी नियंत्रण केले जाते.
मिशन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान किटकनाशक
मिशन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान किटकनाशक आहे. ज्याचा वापर विविध प्रकारच्या पिकांवर केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना अळ्या विरुद्ध चांगले नियंत्रण मिळवून देतो. यामुळं आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. मिशन किटकनाशकामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती आयआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल म्हणाले.
महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मिशन किटकनाशकाला चांगला प्रतिसाद मिळेल
मिशन किटकनाशक हे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. जेणेकरुन त्यांचा जास्तीत जास्त फायदा होईल असे आयआयएलचे उपाध्यक्ष संजय वत्स म्हणाले. महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मिशन किटकनाशकाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचेही वत्स म्हणाले. मिशन हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळं पर्यावरणासाठी हे पूर्णपणे सुरक्षीत आहे. त्यामुळं मिशन हा महाराष्ट्रातील आघाडीचा ब्रँड बनेल असा आम्हाला विश्वास असल्याचे मत कंपनीचे मार्केटिंग विभागाचे मॅनेजर एन बी देशमुख यांनी म्हटलं आहे. आमचे पॅचिमन, हर्क्युलस, टोरी, शिनवा यासारखे ब्रँन्ड्स आधीच शेतकऱ्यांमध्ये लिकप्रिय असल्याचे देशमुख म्हणाले.
इन्सेक्टीसाइड कंपनीबद्दल माहिती
2001 मध्ये राजेश अग्रवाल यांनी इन्सेक्टीसाइड या कंपनीची स्थापना केली होती. अल्पावधीतच ही कंपनी देशांतर्गत पीक संरक्षण आणि पोषण बाजारातील एक अग्रणी बनली. निान केमिकल, जपान नोह्याकू, जपान, ओएटी, आग्रो, यूएसए, मोमेंटिव्ह आणि निहोन यासारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी मिशन चे टायप आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Parbhani News : परभणीत 17 लाखांची बोगस कीटकनाशकं जप्त, पाच जणांना ठोकल्या बेड्या