एक्स्प्लोर

Dhananjay Munde : मला शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, ..तर मी  देखील दिवाळी साजरी करणार नाही : कृषीमंत्री 

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

Dhananjay Munde : दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आगरी पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. जर दिवाळीच्यापूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. मला शेतकऱ्यांच्या वेदना कळतात असेही मुंडे म्हणाले.

विरोधकांवर विश्वास ठेवू नका

पिक विम्याच्या बाबतीमध्ये विरोधक मोठ मोठ्या सभा घेतील अफवा पसरवण्याचं काम करतील. मात्र, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या कळतात, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना देखील टोला लगावला.

 40 लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरच वाटप 

बीडमध्ये 212 लाभार्थ्यांना शासनाच्या कृषी योजनेत विविध प्रकारचे लाभ मिळाले आहेत. यापैकी 40 लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरच वाटप करण्यात आलं. बदलते हवामान आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे त्याचबरोबर यांत्रिक शेती देखील प्राधान्याने केली पाहिजे असे धनंजय मुंडे म्हणाले. शेतीच्या यांत्रिकीकरणाला अधिक पाठबळ देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

धनंजय मुंडे यांनी चालवला ट्रॅक्टर

दरम्यान, लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करत असताना धनंजय मुंडे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 40 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचा वाटप करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे हे लहान असताना त्यांच्याकडे ज्या कंपनीचा ट्रॅक्टर होता, आज त्याच कंपनीचा ट्रॅक्टर धनंजय मुंडे यांनी पहिला आणि  चालवण्याचा आनंद घेतला..

शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा रक्कम देण्यात येते

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार पीक लागवडीपासून 21 ते 25 दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा रक्कम देण्यात येते. म्हणजे ज्या मंडळामध्ये 21 ते 25 दिवस पाऊस पडलेला नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना आगरी पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत असल्याचे मुंडे म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलंSuryakumar Yadav Vidhanbhavan : कॅच बसला हातात! सूर्याकुमार यादवचं विधानभवनात मराठीतून भाषणRohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
Embed widget