Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा 'दगा', द्राक्ष बागांचं मोठं नुकसान; बळीराजाच्या डोळ्यात पाणी
Nashik Rain : नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे.
Nashik Rain : हवामान विभागानं (Meteorological Departmen) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विभागात पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच नाशिक तालुक्यातील बेळगांव ढगा परिसरात गारपीट झाल्यानं निर्यातक्षम द्राक्षाला मोठा फटका बसलाय. काल दीड वाजता द्राक्ष बागेचा व्यवहार केला होता आणि अडीच वाजता पावसानं द्राक्षाचं नुकसान झाल्याची माहिती गोरख जायभावे या शेतकऱ्याने दिली.
बुधवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. मुख्यत:द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं निर्यातक्षम द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत. शेतकऱ्यांनी या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला आहे. खर्च करुन अवकाळी पावसानं मोठं बागेचं नुकसान केलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अवकाळी पावसानं शून्य केलं
आम्ही द्राक्ष पावसात वाचवली, थंडीत वाचवली मात्र, अवकाळी पावसानं आम्हाला शून्य केलं असल्याची प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. आता नेमकं काय बोलावं ते समज नाही. सरकारनं राजकीय जोडे बाजूला ठेवावे आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या अवकाळी पावसानं आमच्या हातचा घास हिरावल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांशी बागेचा व्यवहार झाला होता. मात्र, अशातच अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना दगा दिला आहे. तीन बागेसाठी साधारणत सहा लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती शेतकरी गोरख जायभावे यांनी दिली.
राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: