Richest Farmers : देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोण? वाचा भारतातील पाच श्रीमंत शेतकऱ्यांची माहिती
Richest Farmers : तुम्हाला देशातील श्रीमंत शेतकरी (Richest Farmers) माहित आहेत का? भारतात अनेक शेतकरी करोडपती आहेत. पाहुयात श्रीमंत शेतकऱ्यांची माहीती...
Richest Farmers : जगातील किंवा देशातील श्रीमंत लोकांची (Richest people) नावे तुम्हाला माहित असतील. या श्रीमंत लोकांच्या यादीत बहुतांश मोठे व्यवसायिकच आहेत. पण तुम्हाला देशातील श्रीमंत शेतकरी (Richest Farmers) माहित आहेत का? भारतात अनेक शेतकरी करोडपती आहेत. दरवर्षी ते आपल्या शेतातून करोडो रुपयांचा उत्पन्न काढून त्यांनी मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. आज आपण अशाच भारतातील श्रीमंत शेतकऱ्यांची माहिती पाहगणार आहोत.
रामशरण वर्मा : देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी
रामशरण वर्मा हे उत्तर प्रदेशातील दौलतपूरचे रहिवासी आहेत. ते उत्तर प्रदेशातील एक मोठे शेतकरी आहेत. 1990 मध्ये रामशरण वर्मा यांच्याकडे केवळ पाच एकर शेती होती. पाच एकर शेतीतून सुरूवात करणाऱ्या रामशरण वर्मा यांच्याकडे आज 200 एकरहून अधिक जमीन आहे. 2019 मध्ये रामशरण वर्मा यांना सरकारने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. रामशरण वर्मा हे मुख्यतः भाजीपाल्याची शेती करतात. मिळालेल्या माहितीनुसार रामशरण वर्मा यांची वार्षिक उलाढाल ही सुमारे दोन कोटींच्या आसपास आहे.
रमेश चौधरी : देशातील दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत शेतकरी
भारतातील श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत राजस्थानच्या जयपूरमधील रमेश चौधरी यांचा दुसरा क्रमांक लागतो. रमेश चौधरी यांचे तीन पॉली हाऊस आणि एक ग्रीन हाऊस आहे. रमेश चौधरी पॉलीहाऊसमध्ये टोमॅटो आणि काकडीची लागवड करतात. तर ग्रीनहाऊसमध्ये फुलांची लागवड करतात. यासोबतच रमेश चौधरी हे मक्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या आसपास आहे.
प्रमोद गौतम : देशातील तिसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत शेतकरी
प्रमोद गौतम शेती करण्याआधी ऑटोमोबाईल इंजिनिअर होते. ते एका मोठ्या कंपनीत काम करायचे. मात्र, 2006 मध्ये त्यांनी नोकरी सोडून सुमारे 26 एकरवर शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी भुईमूग आणि तुरीची लागवड केली. मात्र, या शेतीत त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागलं. यानंतर प्रमोद गौतम यांनी संत्रा, द्राक्षे, केळी, लिंबू, पेरू या फळांची बागायती शेती सुरू केली. काही वेळातच त्यांना भरपूर नफा मिळू लागला. यानंतर, प्रमोद गौतम यांनी अनेक पिके घेतली. एक कडधान्य गिरणी देखील स्थापन केली आहे. जिथे कडधान्यांवर प्रक्रिया केली जाते तसेच पॉलिश केली जाते.
सचिन काळे : देशातील चौथ्या क्रमांकांचे श्रीमंत शेतकरी
सचिन काळे हे छत्तीसगडचे शेतकरी आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक लागतो. सचिनही शेती करण्यापूर्वी नोकरी करत होते. मात्र, 2014 साली त्यांनी नोकरी सोडून इनोव्हेटिव्ह अॅग्रीलाइफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कंत्राटी शेती करते. यातून सचिन काळे चांगली कमाई करत आहेत.
हरीश धनदेव : देशातील पाचव्या क्रमांकांचे श्रीमंत शेतकरी
हरीश धनदेव हे राजस्थाने शेतकरी आहेत. त्यांचे इंजिनिअरींगचे शिक्षण झालं आहे. त्यांनी काही काळ नोकरीही केली. मात्र, त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून शेती सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी कोरफडीची लागवड केली. त्यानंतर त्यांनी कोरफडीवर प्रक्रियाही सुरू केली. काही वेळातच हरीश धनदेव यांनी सुमारे 100 एकरात कोरफडीची लागवड करण्यास सुरुवात केली आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे दोन कोटींच्या आसपास आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा