एक्स्प्लोर

Alphonso Mango : गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी, वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा प्रादुर्भाव 

Mango : मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. बदलतं वातावरण (Climate Change) आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.  

Alphonso Mango : कोकणातील हापूसला (Hapus) जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट (Mango production) झाली आहे. मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. बदलतं वातावरण (Climate Change) आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. 

औषधांच्या फवारण्या करुनही थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात नाही

सध्या वातावरणात सातत्याने चढ उतार होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं राहिलं आहे. तसेच आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या करुन देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उष्णतेमुळे आंब्यावर डाग 

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. यामुळे जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे. सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला होता. यावर्षी हापूस आंब्याचं एकूण उत्पन्न 20 टक्केच येणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच यंदा 90 टक्के आंबा बागा मोहरल्या नसल्याने कोकणच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे.

5 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भासणार 

बदलत्या वातावरणामुळे आंब्याला कमी बहर आल्याने 15 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भासणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

उत्पादनाचा खर्चही निघणार नसल्याची स्थिती

दरम्यान, आंबा पिकासाठी उत्पादन खर्चही मोठा आहे. फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Hapus : हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता, एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget