एक्स्प्लोर

E Panchnama : नागपूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई-पंचनामा मोहीम, कमी वेळात अचूक पंचनामा; 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळणार

E Panchnama : नागपूर (Nagpur) विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई-पंचनामा (E Panchnama) मोहीम सुरू झाली आहे.  

E Panchnama : नागपूर (Nagpur) विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई-पंचनामा (E Panchnama) मोहीम सुरू झाली आहे.  शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान मोजण्यासाठी आजवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक पंचनामा प्रक्रियेपेक्षा जास्त अचूक आणि तीव्रतेने होणारी ही प्रक्रिया आहे. राजकीय हस्तक्षेप आणि कामचुकार कर्मचाऱ्यांच्यामुळं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान नव्या प्रक्रियेत टाळता येणार आहे. नुकसान भरपाई दहा ते पंधरा दिवसात  थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळं होणारं शेतीचं नुकसान आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केले जाणारे पंचनामे नेहमीच राजकीय हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र, आता पंचनामे अचूक व्हावे, त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी या उद्दिष्टाने नागपूर विभागात (पूर्व विदर्भात) प्रायोगिक तत्त्वावर 'ई पंचनामा' या उपक्रमाची तयारी सुरू आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने 'ई पंचनामा' करणं सुरु केलं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सध्या नागपूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणारी ई पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राबवली जाणार आहे.  

 काय आहेत ई पंचनाम्याची वैशिष्ट्य 

पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या पंचनाम्यापेक्षा ई-पंचनामा जास्त अचूक
ई  पंचनामा GIS प्रणालीवर आधारित आहे
ई पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष ठिकाणावर जावे लागणार
कार्यालयात बसून पंचनामे करता येणार नाहीत  
जेवढं नुकसान तेवढंच सर्वेक्षण या तंत्रावर ई पंचनामा आधारलेला असल्याने त्यात गाव पातळीवरचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही
आतापर्यंत होत असलेल्या पंचनामाच्या तुलनेत खूप कमी कालावधीमध्ये म्हणजेच अवघ्या 7 ते 10 दिवसात ई पंचनाम्याची शेतापासून मंत्रालय पर्यंतची प्रक्रिया पूर्ण होईल 
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डीबीटी प्रणाली द्वारे मंत्रालयातून एका क्लिकवर त्यांच्या खात्यात उपलब्ध करून देता येईल. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पंचनामा मोहिमेची संकल्पना मांडली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Unseasonal Rains: अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची चिंता; पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
राज्यात अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून जालन्यात दोन जणांचा मृत्यू, तर जनावरेही दगावली, शेती पिकांना मोठा फटका
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
Dattatray Bharne : आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
युरियाच्या साठ्याबाबत काळजी घ्या, आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम; मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
Onion Farmer News : आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार?
Embed widget