Wheat : मोदी सरकारच्या काळात देशात गहू खरेदीत 43 टक्क्यांची वाढ, कृषीमंत्री तोमर यांची माहिती
Agriculture news : मोदी सरकारच्या (Modi government) काळात देशात गहू खरेदीत (wheat purchase) मोठी वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली
Agriculture news : मोदी सरकारच्या (Modi government) काळात देशात गहू खरेदीत (wheat purchase) मोठी वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे. 2014 पासून आत्तापर्यंत गहू खरेदी 43 टक्क्यांची वाढ झाल्याचे तोमर म्हणाले. 2005 ते 2014 मध्ये 1 हजार 972 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी होती. यामध्ये मोठी वाढ 2014 ते 2023 मध्ये गव्हाची खरेदी ही 2 हजार 811 लाख मेट्रीक टन झाली असल्याची माहिती कृषीमंत्री तोमर यांनी दिली.
देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतलं जाते. दरवर्षी सरकारकडून आधारभूत किंमतीनं या गव्हाची खरेदी केली जाते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सरकारकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. दरम्यान, काही भागात अतिवृष्टीचा तर काही भागात अति उष्णतेचा फटका गहू पिकाला बसला आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षीपेक्षा यावर्षी गहू खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
या राज्यांमध्ये गहू खरेदीत मोठी वाढ
यावर्षी हरियाणा आणि पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गहू खरेदी केल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही पाठवले जात आहेत. सध्या गव्हाचा एमएसपी 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये यंदा गहू खरेदीत 7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही गव्हाच्या खरेदीत वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. राजस्थान आणि बिहारमध्येही गव्हाची खरेदी वाढली आहे.
गहू आणि तांदळाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिलाव
वाढत्या गव्हाच्या (Wheat) आणि तंदळाच्या (Rice) किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावले उचलली आहेत. महागाईमुळे गहू तसेच तांदळाच्या दरावर होणारा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने 28 जून 2023 पासून भारतीय अन्न महामंडळाकडील (FCI) गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव करण्यात आला आहे. आतापर्यंत गव्हाच्या लिलावाच्या तीन फेऱ्या आणि तांदळाच्या लिलावाच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. या लिलावांमध्ये, रास्त सरासरी दर्जाच्या गव्हासाठी 2,150 रुपये प्रति क्विंटल राखीव दर आणि निम राखीव सदराखालील गव्हाला 2,125 रुपये प्रति क्विंटल दर तसेच पोषणयुक्त तांदळाला 3,173 रुपये प्रति क्विंटल तर सामान्य प्रतीच्या तांदळाला 3100 रुपये प्रति क्विंटल या दर देण्यात आला आहे. 68,240 टन गहू आणि 210 टन तांदूळ स्वीकारण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: