Agriculture News : आत्तापर्यंत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव, किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिलाव
Agriculture News : भारतीय अन्न महामंडळाकडील (FCI) गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव करण्यात आला आहे.
Agriculture News : वाढत्या गव्हाच्या (Wheat) आणि तंदळाच्या (Rice) किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावले उचलली आहेत. महागाईमुळे गहू तसेच तांदळाच्या दरावर होणारा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने 28 जून 2023 पासून भारतीय अन्न महामंडळाकडील (FCI) गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव करण्यात आला आहे.
गव्हाच्या लिलावाच्या तीन तर तांदळाच्या दोन फेऱ्या
आतापर्यंत गव्हाच्या लिलावाच्या तीन फेऱ्या आणि तांदळाच्या लिलावाच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. या लिलावांमध्ये, रास्त सरासरी दर्जाच्या गव्हासाठी 2,150 रुपये प्रति क्विंटल राखीव दर आणि निम राखीव सदराखालील गव्हाला 2,125 रुपये प्रति क्विंटल दर तसेच पोषणयुक्त तांदळाला 3,173 रुपये प्रति क्विंटल तर सामान्य प्रतीच्या तांदळाला 3100 रुपये प्रति क्विंटल या दर देण्यात आला आहे. 68,240 टन गहू आणि 210 टन तांदूळ स्वीकारण्यात आला आहे.
वाढत्या किंमती नियंत्रण
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 13 जून 2023 रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ यांची विक्री करण्यास मंजुरी देण्यात आली होती. गव्हाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने ओएमएसएस (डी)च्या अंतर्गत ई-लिलावाच्या माध्यमातून केंद्रीय साठ्यातून 15 लाख मेट्रिक टन गहू खरेदीकरिता खुला करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार गहू आणि तांदळाची विक्री करण्यात आली.
पाच जुलैपर्यंत मागवल्या होत्या ई- लिलावाच्या निविदा
भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) प्रादेशिक कार्यालयाने, पाच जुलैपर्यंत ई- लिलावाच्या माध्यमातून त्यांच्या विविध गोदामांमध्ये असलेल्या, सामान्य दर्जाच्या गव्हाच्या विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने मेसर्स एम-जंक्शन द्वारे ई-लिलाव केला http://www.valuejunction.in/fci या संकेस्थळावर शुक्रवारी निविदा अपलोड केल्या होत्या. त्यानुसार आत्तापर्यंत 2,89,800 टन गहू आणि 75,000 टन तांदळाचा लिलाव करण्यात आला आहे.
सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट सुरु आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशा स्थितीत सरकारकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी सुरु आहे. देशात 1.84 कोटी टन गव्हाची खरेदी झाली आहे, मागील वर्षीपेक्षा यंदा गव्हाच्या खरेदीत वाढ झाली आहे. ही वाढ एकूण गहू खरेदीच्या 29.5 टक्के आहे. यंदा देशात 3.42 कोटी टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : 38 हजार टन गहू तर 20 हजार टन तांदूळ विक्रीसाठी खुल्या बाजारात, निविदा पाठवण्याचे आवाहन