(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : जिवंत शेतकऱ्याला दाखवलं मृत, PM किसान पोर्टलचा अजब कारभार, अनुदान गोठवल्यानं प्रकार समोर
Nashik : नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik : नाशिकच्या (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील लखमापूर येथील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi) पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याला (Farmers) मृत घोषीत करुन PM किसान योजनेचे मिळणारे अनुदान गोठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. रमेश केदा बच्छाव असं शेतकऱ्याचे नाव असून ते लखमापूरचे माजी सरपंच आहेत.
अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी
शासनाच्या नियमाप्रमाणे PM किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानं रमेश बच्छाव यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन संबधिंतांवर कारवाई करावी अशी मागणीरमेश बच्छाव यांनी केली आहे. जिवंत शेतकरी PM किसानच्या पोर्टलवर मृत धाकवल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे PM किसान योजना ?
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. PM किसान योजनेची रक्कम वर्षातून तीन वेळा टप्प्या टप्प्यानं दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्याला दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात. म्हणजे वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक
पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. शेतकरी पर्यायामध्ये, आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधा. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही तसे करू शकता. गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ काही ठिकाणी सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील घ्यायला सुरुवात केल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर अनेकांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. शासनाची फसवणूक करुन लाटलेले पैसे परत करा अन्यथा गुन्हे दाखल करु असा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या: