एक्स्प्लोर

Agricultural Census : देशातील 11 व्या कृषी गणनेचा प्रारंभ, प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा होणार वापर

देशातील 11 व्या कृषी गणनेचा (Agricultural Census) ) प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा वापर होणार आहे.

Agricultural Census : देशातील 11 व्या कृषी गणनेचा (Agricultural Census) ) प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर ( Narendra Singh Tomar) यांच्या उपस्थितीत कृषी गणनेचा प्रारंभ करण्यात आला. कृषी गणनेत डेटा संकलनासाठी प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा होणार वापर होणार आहे. भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशात या गणनेमुळं मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं.

कृषी गणनेत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची हीच वेळ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यांच्या राहणीमानात परिवर्तन घडवण्याबरोबरच लहान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना  संघटित करणे. तसेच त्यांना फायदेशीर पिकांकडे आकर्षित करणे आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे तोमर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या ठोस पावलांचे फळ कृषी क्षेत्राला मिळत आहे. देश वेगाने डिजिटल शेतीकडे वाटचाल करत आहे. या गणनेत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची हीच वेळ आहे. कृषी गणनेचा व्यापक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. कृषी गणनेमुळे पिकांच्या मॅपिंगमध्येही योगदान मिळू शकते, जेणेकरून देशाला त्याचे फायदे मिळतील. तोमर यांनी केंद्रीय विभाग, राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांना ही गणना पूर्ण निष्ठेनेने पार पाडण्यास सांगितले.


Agricultural Census : देशातील 11 व्या कृषी गणनेचा प्रारंभ, प्रथमच स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा होणार वापर

मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन

दरम्यान, यावेळी तोमर यांनी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या वापरासाठी गणनेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन देखील केले. तसेच डेटा संकलन पोर्टल, अ‍ॅप देखील सुरु केले आहे. कृषी गणना दर पाच वर्षांनी केली जाते. कोरोना महामारीमुळं विलंबानंतर ही गणना आता हाती घेतली जात आहे. कृषी जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य ऑगस्ट 2022 मध्ये सुरु होईल. कृषी जनगणना हा तुलनेने सूक्ष्म पातळीवर विविध कृषी मापदंडांवर माहितीचा मुख्य स्त्रोत आहे, जसे की ऑपरेशनल होल्डिंगचा आकडा आणि क्षेत्र, त्यांचा आकार, वर्गवार वितरण, जमीन वापर, भाडेकरार आणि पीक पद्धती. कृषी गणनेसाठी प्रथमच डेटा संकलन स्मार्ट फोन आणि टॅब्लेटवर केले जाईल. जेणेकरुन डेटा वेळेत उपलब्ध होईल. बहुतेक राज्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि सर्वेक्षणांचे डिजिटायझेशन केले आहे. ज्यामुळे कृषी गणनेच्या डेटाच्या संकलनाला गती मिळेल. डिजिटलाइज्ड भूमी अभिलेखांचा वापर आणि डेटा संकलनासाठी मोबाइल अॅप्सचा वापर देशातील ऑपरेशनल होल्डिंग डेटाबेस तयार करण्यास सक्षम करेल. तांत्रिक सत्रादरम्यान, कृषी गणना अंमलबजावणी प्रक्रिया आणि वेब पोर्टल आणि मोबाइल अॅपची ठळक वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

wheat prices : गव्हाला मिळतोय विक्रमी दर, वाढती मागणी असताना पुरवठा मात्र कमी 

Agriculture Success Story : जिरेनियममधून बारामतीमधील 30 वर्षीय तरुण कमावतोय वर्षाकाठी 30 लाख रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget