(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : देशाचं कॉफी उत्पादन 40 टक्क्यांनी वाढणार, जैन उद्योग समुहाचा नवा प्रयोग
केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पाठोपाठ आता जळगावच्या जैन उद्योगानं कॉफी पिकांचेही टिशू कल्चर तंत्राने रोप तयार करण्याचं तंत्र विकसित केलं आहे.
Agriculture News : केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पाठोपाठ आता जळगावच्या जैन उद्योगानं कॉफी पिकांचेही टिशू कल्चर तंत्राने रोप तयार करण्याचं तंत्र विकसित केलं आहे. यामुळं देशाच्या कॉफी उत्पादनात चाळीस टक्क्यांची वाढ होणार आहे. याचा कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. जगभरात कॉफी पेयाला मोठी मागणी असल्यानं भारतासह अनेक देशात बियाणांपासून कॉफी पिकवली जाते.
गेल्या तीन वर्षापासून प्रयोग शाळेत विविध प्रकारच्या चाचण्या
बियाणांपासून लागवड करण्यात आलेल्या कॉफी पिकात एकाच शेतात असलेल्या कॉफी पिकाच्या रोपात विविधता दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीनं लागवड करणाऱ्या कॉफी उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास चाळीस टक्के उत्पादनात घट येत असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. यावर मात करण्यासाठी भारतासह जगभरात कॉफी पिकाचं टिशू कल्चर तंत्रानं व्यावसायिकरित्या रोपांचं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत. मात्र, त्याला फारसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यानं केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या कॉफी हाऊस बोर्डानं याबाबत टेंडर प्रक्रिया करून कॉफी पिकाचे टिशु कल्चर तंत्रानं रोप निर्मिती करण्याचं आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावमधील जैन उद्योगाच्या संशोधकांनी गेल्या तीन वर्षापासून प्रयोग शाळेत विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. कॉफीचा अधिक उत्पादन देणाऱ्या निरोगी झाडाचे जनुकीय तंत्राने अनेक रोप तयार करण्यात यश मिळविल्याने,अशा पद्धतीने कॉफी पिकाचे व्यावसायिक रित्या टीशू कल्चर रोप तयार करण्यात जैन उद्योगासह भारताला पहिल्यांदा यश मिळाले असल्याचं मानले जात आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनातही मोठी वाढ होणार
जैन उद्योगाच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनामुळं कॉफी लागवड केल्यानंतर त्यात चाळीस टक्के उत्पादनात वाढ होणार आहे. कॉफी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनातही मोठी वाढ होणार असल्याने, लागवड क्षेत्र वाढण्याबरोबर, देशाला ही त्याचा आर्थिक फायदा मिळणार असल्याचं सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: