एक्स्प्लोर

Agriculture News : महाराष्ट्रात 28 लघु सिंचन प्रकल्प पूर्ण, 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण; राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांची माहिती

Agriculture News: महाराष्ट्रात 2018 ते 2022 मध्ये 28 लघु सिंचन प्रकल्प (Irrigation Projects) पूर्ण झाले आहेत. याबाबतची माहिती जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी दिली.

Agriculture News : महाराष्ट्रात (Maharashtra News) 2018 ते 2022 मध्ये 28 लघु सिंचन प्रकल्प (Irrigation Projects) पूर्ण झाले आहेत. या माध्यमातून एकूण 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असल्याची माहिती जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू (Union Minister of State for Tribal Affairs and Jal Shakti Bishweswar Tudu) यांनी राज्यसभेत दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजने (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) अंतर्गत महाराष्ट्रातील जिहे काठापूर (गुरुवर्य लक्ष्मण इनामदार) उपसा सिंचन प्रकल्पाचा (Upsa Sinchan Yojna) समावेश करण्यात आला. या प्रकल्पाचे क्षेत्र 27 हजार 500 हेक्टर असून 2017 ते 18 च्या दरानुसार, अंदाजे 1200 कोटी रुपयांचा खर्च असल्याचे तुडू म्हणाले. 

केंद्र सरकारने 2018 मध्ये महाराष्ट्रातील 8 मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प तसेच 83 भूपृष्ठ लघु सिंचन (एसएमआय) प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2018-19 दरम्यान 13 हजार 651.61 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला होता. तर अतिरिक्त 3.77 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी निधी अंतर्गत 3 हजार 831.41 कोटी रुपयांचे एकूण अर्थसहाय्य देण्यात आले होते. आतापर्यंत यापैकी 28 एसएमआय प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून एकूण 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असल्याचे राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू म्हणाले.

 महाराष्ट्रातील 26 प्रकल्पामुळं 314.71 हजार हेक्टरची अतिरिक्त सिंचन क्षमता

2016 मध्ये पंतप्रधान कृषी सिंचाई योजना-वेगवान सिंचन लाभ कार्यक्रमाचा प्रारंभ करताना, महाराष्ट्रातील 26 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला होता. या प्रकल्पांचा शिल्लक अंदाजित खर्च 21 हजार 925.75 कोटी रुपये असून यासाठी केंद्र सरकारकडून 3 हजार 109.98 कोटी रुपये सहाय्य देण्यात आले आहे. 26 प्रकल्पांच्या प्रगतीमुळं आत्तापर्यंत 314.71 हजार हेक्टरची अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यापैकी 9 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. प्रमुख आणि मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून एकाच वेळी  क्षेत्र विकास कार्यक्रम आणि जल व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसह आर्थिक सहाय्य दिले जाते.  मात्र, आपल्या अधिकार क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी, परिचालन  आणि देखभाल करणे ही संबंधित राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निकषांनुसार, केंद्रीय जल आयोगाद्वारे ज्या प्रकल्पांची रचना राज्य सरकारच्या संरचना संस्थेद्वारे केली जाते, त्या प्रकल्पाचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार; जर्मनीच्या KFW बँकेच्या कर्जासह हमीस केंद्राची मंजुरी

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
Embed widget