T20 WC Points Table : द.आफ्रिकेला मात देत गुणतालिकेत पाकिस्तानची झेप, ग्रुप 2 मध्ये सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी चुरस
PAK vs RSA T20 WC : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप 2 मधील पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात 33 धावांनी पाकिस्तान विजयी झाला आहे. DLS मेथडन्वये पाकिस्तानने हा विजय मिळवला आहे.

T20 World Cup 2022 Semifinal scenario : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सध्या सुपर-12 फेरीचे सामने सुरु असून आता केवळ 6 सामने शिल्लक आहेत. त्यानंतर सेमीफायनलचे सामने सुरु होतील. दरम्यान भारत असणाऱ्या ग्रुप 2 चा विचार करता सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी अगदी चुरशीची लढत दिसून येत आहे. आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघच सेमीफायनलचे दावेदार होते, पण पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेवर एक मोठा विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली असून सेमाफायनलच्या रेसमध्ये पुनरागमन केलं आहे.
तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत ते थेट तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही +1.441 इतका झाल्यामुळं ते स्पर्धेत मजबूत स्थितीत आले आहेत. भारत अव्वलस्थानी असला तरी नेटरनरेटच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघच सेमीफायनलच्या शर्यतीत पुढे असून नेदरलँड, झिम्बाब्वे यांचं आव्हान जवळपास संपलं आहे. बांगलादेशचंही पुढे पोहोचणं अवघड आहे.
भारताला झिम्बाब्वेवर विजय महत्त्वाचा
आता भारताचा विचार करता भारत 6 गुणांसह सर्वात वर आहे. पण दक्षिण आफ्रिकेने त्यांचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध जिंकला तर ते 7 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचतील. पण भारतानेही झिम्बाब्वेला मात दिल्यात 8 गुणांसह भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण जर भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला, तर मात्र पाकिस्तानच्या सामन्यावर भारताला अवंलंबून रहावं लागेल. कारण पाकिस्ताननं त्यांच्या अखेरच्या सामन्यात बांग्लादेशवर विजय मिळवल्यास त्यांचेही 6 गुण होतील आणि नेटरनरेटने ते भारताला मात देतील. तेव्हा दक्षिण आफ्रिका जर पराभूत झाली तर भारत पाकिस्तानसोबत सेमीफायनलमध्ये जाईल. त्यामुळे जर भारताला पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघावर अवंलंबून राहयाचं नसेल, तर त्यांना झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.
ग्रुप 2 ची गुणतालिका
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | भारत | 4 | 3 | 1 | 0 | 6 | +0.730 |
2 | दक्षिण आफ्रिका | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +1.441 |
3 | पाकिस्तान | 4 | 2 | 2 | 0 | 4 | +1.117 |
4 | बांगलादेश | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -1.276 |
5 | झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | 0 | 3 | -0.313 |
6 | नेदरलँड्स | 4 | 1 | 3 | 0 | 2 | -1.233 |
ग्रुप 1 चं गणित कसं?
न्यूझीलंडला ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीत जाण्याची चांगली संधी आहे. या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे सध्या चार सामने खेळून प्रत्येकी पाच गुण आहेत. न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. दुसरीकडे इंग्लंडह श्रीलंकेविरुद्ध सामना खेळणार आहे. पण या दोघांमधील जो संघ मोठ्या नेटरनरेटने सामना जिंकेल तोच सेमीफायनलमध्ये जाईल. दुसरीकेड श्रीलंकेने इंग्लंडला हरवले आणि ऑस्ट्रेलियानेही आपला सामना गमावला तर श्रीलंका संघ उपांत्य फेरीत जाईल. पण न्यूझीलंडनेही आपला सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या तिघांसाठीही मार्ग खुला होईल. दुसरीकडे आयर्लंड, अफगाणिस्तान यांचं आव्हान संपलं आहे.
कशी आहे गुणतालिका?
सुपर-12 ग्रुप 1
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | नेट रनरेट |
1 | न्यूझीलंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +2.233 |
2 | इंग्लंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | +0.547 |
3 | ऑस्ट्रेलिया | 4 | 2 | 1 | 1 | 5 | -0.304 |
4 | श्रीलंका | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.457 |
5 | आयर्लंड | 4 | 2 | 1 | 0 | 2 | 1.544 |
6 | अफगाणिस्तान | 4 | 0 | 2 | 2 | 2 | -0.718 |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
