(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : ब्रँडन मॅक्युलमला 'या' विकेटकीपर फलंदाजात दिसते धोनीची झलक
IPL 2022 : भारताचा सर्वात महान यष्टीरक्षक म्हणजे एमएस धोनी यात काहीच शंका नाही. त्याचीच झलक एका युवा खेळाडूत दिसत असल्याचं ब्रँडन मॅक्युलमने म्हटलं आहे.
IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये केकेआर संघाचं प्रदर्शन आतापर्यंत उत्तम आहे. त्यांनी यंदा एका नव्या खेळाडूला यष्टीरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान याच खेळाडूमध्ये अर्थात शेल्डन जॅक्सनमध्ये महान विकेटकिपर एमएस धोनीची झलक दिसते, असं वक्तव्य संघाचा कोच ब्रँडन मॅक्युलमने केलं आहे. ब्रँडन स्वत:ही एक महान यष्टीरक्षक फलंदाज राहिला असल्याने त्याला विकेटकीपिंगची चांगली समज आहे. धोनीसह तुलना करताना फलंदाजीत ब्रँडनने शेल्डनची तुलना आंद्रे रसेलशी केली आहे.
शेल्डन जॅक्सनच्या फलंदाजीबद्दल बोलताना ब्रँडन म्हणाला, त्यातती फलंदाजी आणखी सुधारत आहे. दरम्यान खूप कमी जणांना शेल्डन हा 35 वर्षांचा असल्याचं माहित असून मागील दोन वर्षात त्याच्या खेळात कमालीचा सुधार झाला असल्याचं ब्रँडन म्हणाला. त्याच्याकडे बॉलला सीमारेषेपलीकडे टाकण्याची क्षमता असून तो विकेटकीपिंगमध्येही चतुराई दाखवत असल्याचं ब्रँडनचं मत आहे.
धोनीसोबत केली तुलना
शेल्डन जॅक्सनची तुलना धोनीसोबत करताना ब्रँडन म्हणाला, 'शेल्डनची विकेटकीपिंग शानदार आहे. त्याची कीपिंग पाहताना काय महेंद्रसिंह धोनीची आठवण येते. तो विकेटकीपिंग अगदी चपळाईने करतो आणि त्याला फिरकीपटू गोलंदाजी करतानाही योग्य कीपिंग करता येते. आतापर्यंत शेल्डनने आयपीएलमध्ये केकेआरकडून काही सामने खेळले आहेत. तीन सामन्यात त्याने उत्तम कीपिंग केली असल्याने त्याची जागा संघात पक्की झाली आहे.
हे देखील वाचा-
- CSK vs PBKS: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव
- CSK vs PBKS: ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, 'या' गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
- CSK vs PBKS: चेन्नईमधून 'या' खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha