(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Hegde : ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पूजानं घेतले कोट्यवधींचे मानधन; स्टाफला देखील मिळणार एक कोटी
‘जन गण मन’(Jan Gana Mana) या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि पूजा हे एकत्र काम करणार आहेत.
Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) 'राधे श्याम' या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती ‘जन गण मन’(Jan Gana Mana) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि पूजा हे एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी पूजानं आणि तिच्या स्टाफनं कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. जाणून घेऊयात तिच्या फीबाबत...
राधे श्याम, बीस्ट आणि चिरंजीवी-राम चरण यांच्या आचार्य या चित्रपटामध्ये काम केलेल्या पूजा हेगडेनं ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्यामधील चार कोटी ही तिची फी आहे. तर एक कोटी हे तिच्या स्टाफचे मानधन आहे.
‘जन गण मन ’हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार, पूजानं या चित्रपटासाठी ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पूजानं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.
पूजा हेगडेनं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लावली होती हजेरी
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पूजा हेगडेपहिल्यांदाच रेड कार्पेटवर वॉक करणार होत्या. तिच्या रेड कार्पेटवरील लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. पूजा हेगडेनं Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेबाबत सांगितलं. मेकअप, ड्रेस, परफ्यूम, खरे दागिने इत्यादी सामान पूजाच्या सूटकेसमध्ये होते. त्या सूटकेसमध्ये ती जे ड्रेस कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये परिधान करणार होती, ते होते. ऐनवेळी सूटकेस गायब झाल्यानं पूजाला रडू येत हेते. पण नंतर सर्व गोष्टी पुन्हा मॅनेज करण्यात आल्या. पूजानं रेड कार्पेटवरील प्रत्येक दिवसाच्या लूकचे फोटो शेअर केले.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा :