(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baba siddique Murder case : मोठी बातमी : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुसऱ्या आरोपीचे वय तपासण्याचे आदेश
Baba Siddique Murder case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील एका आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये, तर दुसऱ्या आरोपीचे वय तपासण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
Baba siddique Murder case : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री यांची शनिवारी (दि.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (दि.13) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप वय तपासले जाणार आहे.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने गांभीर्याने घेतला
एका आरोपीचे वय 17 असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलीस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
सरकारी वकिलांनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?
सरकारी वकिल न्यायालयात म्हणाले, आरोपी आपली नावही तपासात वेगवेगळी सांगत आहेत. पोलिसांकडील आधारकार्ड दाखवले असता. त्यावरील तारखेनुसार जन्मतारीख 21 होतं. पुण्यात हे आरोपी काय करत होते कोणाकडे रहात होते? आधी गुन्ह्यातील तपास पहावा त्यात काही मिळतयं का त्या आधारावर पुढील कस्टडी द्यावी. दहा दहा टीम त्याचा शोध घेत आहेत तरीही हे मिळत नाही. एखाद्या पिच्चरमधील स्टोरीप्रमाणे हा कट रचलेला आहे. आम्हाला 14 दिवसाची कोठडी मिळायला हवी. आरोपीनी ज्यांन मारलं आहे ती राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.
यातील आरोपी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं वाहन कोणी दिलं याचा तपास होणं महत्वाचं आहे. या आरोपींकडून 28 जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता? यात अन्य दोन आरोपी फरार आहेत. हे कुठल्या गँगशी जोडलेले आहेत का? असे सवालही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारलं असता त्याने स्वत:चं वय 17 सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रीटमेंट मिळावी, अशी मागणीही वकिलांकडून करण्यात आली होता. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपीचे वय तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Baba Siddique : मुलगा भंगार गोळा करायच्या कामासाठी पुण्याला गेला, पण फोन उचचला नाही; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीची आई काय म्हणाली?