एक्स्प्लोर
ठाणे : अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणात गंधक
अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणाच्या पात्रात गंधक आढळून आलंय. त्यामुळं हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिलाय. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्या सांडपाणी आणि रासायनिक कचरा टाकत असल्याचा प्रकार मागील वर्षी एबीपी माझाने समोर आणला होता. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं चिखलोली धरणातल्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. आणि आता या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यामुळं यानंतर तरी यंत्रणेचे डोळे उघडावेत आणि धरणं नासवणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतेय.
बातम्या
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
























