IND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदार
IND vs BAN Match Report : भारतीय संघाने विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी दारुण पराभव केला. नजमुल हसन शंतोच्या नेतृत्वातील बांगलादेशल सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत यांनी फलंदाजीत अमुलाग्र योगदान दिलं. तर गोलंदाजीत शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांनी जलवा दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 183 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ आठ विकेटच्या मोबदल्यात 122 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
बांगलादेशकडून महमुदुल्लाहने 28 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर शाकीब अल हसनने 34 चेंडूत 28 धावा केल्या. याशिवाय सौम्या सरकार, तनजीद हसनलिटन दास. नजमुल हसन शांतौ आणि तौहीद हृदय या फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.